कुख्यात गुंड विक्की देशमुखसह १० जणांवर नवी मुंबई पोलिसांची मोक्का अंतर्गत कारवाई


नवी मुंबई (प्रतिनिधी)- नेरुळ येथील सचिन सर्जेराव गर्जे या तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांना हवा असलेल्या कुख्यात गुन्हेगार विक्की देशमुख याच्यासह त्याचे इतर साथीदार अशा एकूण १० जणांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई केली असल्याची माहिती गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त प्रविणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत विक्रांत चंद्रकांत कोळी (२२), रा.गव्हाणगाव, नारायण रामचंद्र पवळे, (२७)रा.कळंबोली, रुपेश कमलाकर झिराळे (३७)रा. तुरमाळे पनवेल, तुषार चंद्रकांत कोळी(२५)रा. न्हावागाव ह्या सचिन गर्जे याच्या हत्येप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या चौघा आरोपींसह सदर हत्येप्रकरणी पोलिसांना हव्या असलेल्या कख्यात विक्की देशमुख, जितेंद्र देशमुख, प्रीतम कोळी, रोशन कोळी, राकेश कोळी व परशराम कोळी या सहा जणांचा अशा एकूण १० जणांचा समावेश आहे. नेरुळ येथे राहणारा ३२ वर्षीय सचिन सर्जेराव गर्जे याचे संघटित गुन्हेगारी टोळीचा सुत्रधार असलेल्या विक्की देशमुख व त्याच्या इतर उपरोक्त साथीदारांनी सीवूड ग्रँट मॉल येथून काही महिन्यांपूर्वी अपहरण करुन त्याची हत्या करुन मृतदेह समुद्रामध्ये फेकून दिला होता. मात्र सदरचा मतदेह काही दिवसांनी पन्हा समुद्राच्या किनारी आल्यामुळे त्यास खाडीच्या किनारी गाडला व पुन्हा सदरचा मृतदेह काढून पनवेल तालक्यातील कर्नाळा येथील डोंगराळ भागात जाळून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३६४, २०१, १२० (ब)३४ सह आर्स अॅक्ट अन्वये दि.१४ नोव्हेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचे गाभीय लक्षात घेऊन पोलिस आयुक्त संजय कुमार सह पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर तसेच गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलेल्या तपासामध्ये गर्जे याच्या हत्येत कुख्यात गुन्हेगार विक्की देशमुख याच्यासह त्याच्या सहभाग साथीदाराचा असल्याचे निष्पन्न होऊन पथकाने विक्रांत चंद्रकांत कोळी (२२), रा.गव्हाणगाव, नारायण रामचंद्र पवळे,(२७)रा.कळंबोली, रुपेश कमलाकर झिराळे (३७)रा. तुरमाळे पनवेल व तुषार चंद्रकांत कोळी(२५)रा. न्हावागाव या चौघा जणांना अटक केली असून सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर विक्की देशमुख याच्यासह जितेंद्र देशमुख, प्रीतम कोळी, रोशन कोळी, राकेश कोळी व परशुराम कोळी हे सहाजण अजूनही पोलिसांच्या हाती लागले नसून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, या टोळीचा प्रमुख असलेला विक्की देशमुख याच्यावर यापूर्वी नवी मुंबई, ठाणे, रायगड येथील विविध पोलिस ठाण्यात मोक्का, खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दरोडा, मारामारी, जबरी चोरी यासारखे ३१ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्या साथीदारांविरोधातही नवी मुंबई, ठाणे, रायगड येथे अशाचप्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिली.


मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेल्या गन्हेगारांमध्ये विक्की देशमख याच्यासह त्याच्या टोळीतील