रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक


मुंबई - मुंबईकरांनो वेळापत्रक पाहून बाहेर पडा कारण मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळ काही लोक लच्या वेळात्रकात बदल करण्यात आला आहे तर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहे. रुळ, सिग्नल आणि इतर तांत्रिक कामांसाठी तिन्ही लोकल मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर पनवेल ते मानखुर्द दरम्यान दोन्ही मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते वडाळा, वडाळ्याहून वाशी, बेलापूर, पनवेल या स्थानकादरम्यान १० ते संध्याकाळी ४ पर्यंत एकही लोकल धावणार नाही. त्यामुळे मेगाब्लॉकचं वेळापत्रक पाहून बाहेर न पडल्यास मेगाहाल होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण डाऊन स्लो मार्गावर रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ४ पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या कालावधीमध्ये धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. जलद मार्गावर मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली कल्याण या मार्गावर लोकल थांबतील. पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवली स्थानका दरम्यान १०.३५ ते ३.५० या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. दोन्ही दिशेनं जाणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल या जलद मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणेवाशी आणि नेरुळ दरम्यान लोकल सेवा सुरू असेल. तर सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान काही विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.