नेरुळ (प्रतिनिधी) - कायद्याचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना फक्त थेरोटीकल नॉलेजची आवश्यकता नसून प्रत्यक्षात डिग्री पूर्ण केल्यानंतर कोर्टात कशी केस लढायची याचे प्रात्यक्षिक नॉलेज मिळण्याची आवश्यकता असते, यासाठी चौथ्या राष्ट्रीय मुट कोर्ट स्पर्धेचे आयोजन नेरुळ येथील डॉ. डी.वाय. पाटील विधी महाविद्यालयात करण्यात आले होते .१३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत मुट कोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून डॉ. डी.वाय. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या स्पर्धेत विविध भागांतील २० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत सिबॉयसेस कॉलेज ऑफ लॉ आणि इनाएमआयएमएस मुंबई यांनी क्रमांक पटकावले. यात सहभागी असलेल्या राज्यासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, तामिळनाडू, उत्तराखंड या राज्यातील महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ. डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ लॉचे प्राध्यापक अॅड पौर्णिमा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मुट कोर्ट असोसिएशनच्या सचिव प्रांजल झा आणि सहसचिव श्वेता राणा यांनी काम पाहिले. या स्पर्धेत सहभागी _झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपापली छाप ठेवली. याप्रसंगी माजी न्यायमूर्ती कायदेतज्ज्ञ अनिल जोशी, अॅड. सोनवलकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अॅड. शिवगणेश आययर, अॅड. अर्पण राजपूत, अॅडरणजित सांगळे, अॅड. आनंद पटवर्धन, अॅड. अखिलेश जैस्वालअॅड. अंकिता सेन, अॅड. सायली सावंत, ॲड. सूची वाघांनी, अँडविक्रांत शेट्टी, अॅड. शैलेश कंठारीयाअॅड. सौरभ पाटील उपस्थित होते.
डॉ. डी.वाय. पाटील विधी महाविद्यालयातील चौथ्या राष्ट्रीय मुट कोर्ट स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद