कचरा बीन्स दुरावस्थेत.


स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई महापालिकेतर्फे मोठा निधी खर्च करून शहरात ठिकठिकाणी मोठया प्रमाणात कचरा संकलन करण्यासाठी कचऱ्याचे बीन्स बसविण्यावर भर देण्यात आला होता. मात्र स्वच्छ सर्वेक्षण अभियान संपताच आता महापालिकेचे स्वछताविषयक बाबींकडे काहीसे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसत आहे. कोपरखैरणे गुलाबडेरी समोरील दुभाजकावरती कचरा कुंडी अर्थात कचरा बीन्स कचऱ्याच्या अवस्थेत टाकून दिला असल्याने महापालिकेने याकामी केलेला खर्च वायफळ ठरला असल्याची नाराजीची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात असून महापालिकेने या प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.