कोपरखैरणेतील मुलास भटक्या कुत्र्याचा चावा


कोपरखैरणे (प्रतिनिधी) - कोपरखैरणे (से. १५) येथील सुशांत सायबना सोनकटले या ७ वर्षे वयाच्या मुलाच्या उजव्या पायाच्या खालील भागास एका भटक्या कुत्र्याने जोरदार चावा घेतल्याने त्याला गंभीर इजा झाली. वाशीतील महापालिका रुग्णालयात उपचार करुन त्याला घरी पाठविण्यात आले. दरम्यान, कोपरखैरणेत भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर लोकांसाठी भीतीदायक असून अशा कुत्र्यांचा महापालिका प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा स्थानिक रहिवासियांसोबत महापालिका वार्ड ऑफिसवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नगरसेविका अॅड. भारती पाटील यांनी संबंधीत महापालिका अधिकाऱ्यांना दिला आहे.