अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या विषयक मार्गदर्शन


पनवेल (प्रतिनिधी) - नागरी हक्क संरक्षण विभाग कोकण परिक्षेत्र यांच्यातर्फे आयोजित अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या संदर्भात कार्यशाळेत नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, सह पो.आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रायगडचे शासकीय अभियोक्ता प्रसाद पाटील यांनी तपासी अंमलदार यांना अॅट्रॉसिटी तपास करताना होणाऱ्या चुका व तपासाबाबत घेण्याची काळजी बाबतची माहिती दिली तर ठाणे समाज कल्याण अधिकारी बलभीम शिंदे यांनी अॅट्रॉसिटी मधील पीडित व्यक्तींना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीबाबत मार्गदर्शन केले. सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन येथे आयोजित या कार्यशाळेत नागरी हक्क संरक्षण महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महा निरीक्षक कैसर खालिद, तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, ठाणे पोलीस आयुक्तालय, पालघर, ठाणे ग्रामीण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इत्यादी भागातून पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच कोकण परिक्षेत्रातील महसूल व समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कोकण परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. कैसर खालिद विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात व तपासाबाबत तसेच ट्रॉसिटी कायद्यातील नवीन तरतुदी याबाबत मार्गदर्शन केले.