खारघर, नवीन पनवेल, सीबीडी बेलापूरमधील जागांना सोन्याचा भाव!

सिडकोकडून ९ भुखंडांची २२० कोटी रुपयांना विक्री



नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडको महामंडळातर्फे ई-लिलाव प्रक्रियेद्वारे खारघर, नवीन पनवेल (प.) आणि सीबीडी बेलापूर येथील एकूण ९ भूखंड विक्री योजनेस निविदाकारांचा उत्तम प्रतिसाद लाभून सर्व भूखंडांची विक्रमी दराने विक्री करण्यात आली आहे. सदर विक्रीतून सिडको महामंडळास अंदाजे २२० कोटी रूपये इतका महसुल प्राप्त झाला आहे. योजना पुस्तिकेतील वेळापत्रकानुसार काल, (दि.२५) सिडको भवन येथे संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पडली. प्राप्त झालेल्या ई-निविदा निविदादारांच्या समोर ऑनलाईन माध्यमातून उघडण्यात आल्या व ई-लिलाव प्रक्रियेमधील बोलींची तुलना करण्यात येऊन यशस्वी निविदाकारांची नावे जाहीर करण्यात आली. बेलापूरमधील जागांना सोन्याचा भावखारघर येथील भूखंड क्र. एफ९२+एफ९७ व भूखंड एफ९६ करीता रु. १५,८६१, भूखंड क्र. ६२बी करीता रु. ६०, ९३९ आणि भूखंड क्र. ६२सी करीता रु.७३, ६३५ इतका आधारभूत (प्रति चौ.मी.) निश्चित करण्यात आला होता. नवीन पनवेल (पयेथील भूखंड क्र. करीता ७ व ८ करीता रु. ५१, ६०४ आणि भूखंड १५ करीता रु. ६३, ३३२ व भूखंड २२ करीता रु. ५१, ६०४ इतका आधारभूत दर निश्चित करण्यात आला होता. सीबीडी बेलापूर येथील भूखंड क्र. ३ए करीता रु.६८, ५५७ इतका आधारभूत निश्चित करण्यात आला होता. बंद निविदेमध्ये उद्धृत करण्यात आलेली बोली किंवा लिलावामध्ये उद्भत करण्यात आलेली बोली यांपैकी जी बोली जास्त रकमेची असेल ती बोली स्वीकारण्याचा निकष निश्चित करण्यात आला होता. या निकषानुसार सदर सर्व भूखंडांकरिता ई-लिलाव प्रक्रियेमध्ये उद्धृत करण्यात आलेली सर्वाधिक रकमेची बोली स्वीकारण्यात येऊन संबंधित अर्जदारांना यशस्वी म्हणून घोषित करण्यात आले. भूखंडांच्या आधारभूत दरापेक्षा या बोली सरासरी दुपटीने अधिक आहेत. ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रिये अंतर्गत अर्ज नोंदणीअनामत रकमेचा भरणा, निविदा भरणे या सर्व प्रक्रिया सुलभपारदर्शक व जलद अशा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आल्या. यामध्ये ऑनलाईन बंद निविदा सादर करणे निविदाकारांना अनिवार्य होते. बंद निविदा सादर करणाऱ्या निविदाकारांनाच पुढील टप्प्यातील ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार होते. सीबीडी बेलापूर येथील भूखंड क्र. ३ए करीता कानेर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्यातर्फे उद्धृत करण्यात आलेली रु. १,६७,५५७ (प्रति चौ.मी.) ही सर्वात महत्तम बोली ठरली.