ऐरोली (प्रतिनिधी) - नातेवाईकांपासून ताटातुट झाल्यानंतर स्वत:कडे पैसे नसल्यामुळे आपल्या घरी जाण्यासाठी मदतीची याचना करणा-या एका तरुणीच्या असहाय्यतेचा फायदा उचलत रिक्षाचालकासह दोघेस्कुटीचालक अशा एकूण तिघा जणांनी सदर बलात्कार करण्याचा प्रकार रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुकताच घडला. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तरुणीवर बलात्कार करणाऱ्या तिघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांना २९ तारखेपर्यंतची पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत हकीकत अशी की, यातील पिडित १९ वर्षीय तरुणी ही दारोदारी तुप विक्री करुन आपला उदरनिर्वाह करणारी आहे. दि.१८ फेब्रुवारी रोजी घाटकोपर रेल्वे स्थानकावर लोकल पकडतांना तिची आपल्या नातेवाईकांपासून ताटातुट झाली होती. याबाबत ती हरविल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी कुर्ला पोलिस ठाण्यात नोंदविली होती. सदर पिडित आपल्या नातेवाईकांचा शोध घेत म्बा रेल्वे स्थानकात पोहचून तेथेच रात्री तिने मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी ती दिवा रेल्वे स्थानक येथे आली. दरम्यान, नातेवाईकांचा शोध घेत असतांना तिच्याकडील पैसे संपल्यामुळे तिने एका वृध्द महिलेस आपल्या नाकातील सोन्याचे फुल विक्री करुन पैसे मिळवून देण्यास विनंती केली असता, सदर वृध्देने तिला आपल्यासोबत महापे परिसरातील झोपडपट्टीत आणली. मात्र तिथेही तिचे दागिने विक्री करणे तिला शक्य झाले नसल्यामुळे महापे परिसरातील साई सागर हॉटेल चौकात उभी राहून ती येणाऱ्या जाणाऱ्याकडे मदतीची याचना करु लागली. याचवेळी तेथे आलेल्या रिक्षाचालकास तिने जवळच्या रेल्वे स्थानकावर सोडण्यास सांगितले. मात्र नराधमाने तिला रेल्वे स्थानकावर नेण्याचा बहाणा करत तिला जबरदस्तीने रिक्षातून महापेबस स्थानकलगतच्या एका पडिक इमारतीमधील बाथरुममध्ये नेऊन धमकावत तिच्यावर अत्याचार केला तसेच तिच्या कानातील सोन्याचे दोन कर्णफुले, नाकातील फुली पायातील चांदीचे पैंजन काढून घेत तिला नंतर महापे परिसरातील एका मंदिराजवळ सोडून पलायन केले होतेयानंतरही पिडित महिला ही स्वत: ला कसेबसे सावरत रेल्वे स्थानकाकडे कसे जायचे या विवंचनेत असतांनाचएतेथे एका अॅक्टीव्हा स्कुटीवरुन आलेल्या दोघा जणांनी पिडित महिलेला मदत करण्याचा बहाणा करत आपल्या स्कुटीवरुन घणसोली रेल्वे स्थानकाजवळील बेलापूर ठाणे रोडच्या डाव्या बाजुस पाईपलाईनजवळ नेऊन दोघांनीही तिच्यावर जबरी बलात्कार केला. याप्रकरणी सदर घटनेबाबतचा गुन्हा कुर्ला रेल्वे स्थानकपोलिसांकडून सुरुवातीला दाखल झाल्यानंतर अधिक तपासासाठी रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. | यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता, पिडितेने तक्रारीत वर्णन केलेल्या तिन्ही आरोपींचे वर्णन, रिक्षा व अॅक्टीव्हा स्कुटर यांचे सविस्तर वर्णन तसेच खब-याकडून मिळालेल्या माहितीनुसार तपास करुन पोलिसांनी यातील तिघा आरोपींना जेरबद केले.
मदतीसाठी याचना करणाऱ्या तरुणीवर अत्याचार! रिक्षाचालकासह तिघा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या