हिंदु जनजागृती समितीचे तहसिलदारांना निवेदन... युवतींवरील अत्याचाराला कारणीभूत ’व्हॅलेंटाइन डे’ची विकृती बंद करा!


मुंबई (प्रतिनिधी) - 14 फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्याची कुप्रथा आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे. ज्या व्हॅलेंटाइनला ख्रिस्त्रांचे धर्मगुरु पोप यांनीच या नावाचा कोणी संत नाही’ असे सांगून रोमन दिनदर्शिकेतून कधीच हटवले आहे, त्याच्या नावाने भारतात ‘प्रेम दिवस’ साजरा करणे, हे दुर्दैवी आहे. प्रेम दिवस म्हणून व्हॅलेंटाइन डे’ साजरा करू नका आणि लैगिंक अत्याचारांपासून आपल्या पाल्यांना वाचवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे. तसेच समितीच्यावतीने विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांसमवेत मुंबई जिल्हाधिकारी आणि मुलुंड येथे तहसीलदार यांना भेटून वरील विषयाचे निवेदन दिले.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रेम व्यक्त करण्याच्या नादात एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार आदी अपराध घडतात; तसेच मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन आदीही गैरकृत्रे केली जातात. हे अत्यंत गंभीर आहे; ’व्हॅलेंटाइन डे’चे स्तोम वाढण्यामागे  विदेशी कंपन्या आहेत. युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी गुलाबाची फुले, हृदराच्या आकाराचे लाल फुगे, चॉकलेट, भेटवस्तू आदींद्वारे मार्केटिंग करून गल्ला भरला जातो, हे समजून घ्यायला हवे; व्हॅलेंटाईन डे’ साजरा करून आपण पाश्‍चात्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करत आहोत. त्यामुळे यासाठी ’व्हॅलेंटाइन डे’ची कुप्रथा रोखा अन् हिंदु संस्कृतीनुसार आचरण करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती करत आहे.