चिमुकल्यांचा उघड्यावरील पाईपांमध्ये ‘लपाछपीचा’धोकादायक खेळ!


ठाणे बेलापूर मार्गावरील पुर्व बाजुकडील रबाळे बसस्टॉपलगत जलवाहिनी टाकण्यासाठी ठेकेदाराने उघड्यावर पाईप आणून  ठेवले आहेत. मात्र ठाणे-बेलापूर रोडवरील सिग्नलवर उभे राहून हार विक्रीचा व्यवसाय करुन उपजिविका करणार्‍यांची चिमुकली मुले या पाईपांमध्ये लपाछपीचा खेळ खेळतांना दिसत असून एखादी अपघाती घटना घडल्यास हा धोकेदायक खेळ मुलांच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे सदरची ही बाब लक्षात घेऊन संबंधित ठेकेदारांनी तसेच महापालिका प्रशासनाने लक्ष पुरवून उघडयावरील या पाईपांच्या ठिकाणी योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे. (छायावृत्त - नितीन पडवळ)