नवी मुंबई महिला काँग्रेसची मागणी... विद्यार्थीनींचा विनयभंग प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करा!


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका महापे येथील शाळेमध्ये घडलेल्या प्रकरणातील दोषी संगणक शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्षा सुदर्शना कौशिक यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन काल नवी मुंबई पोलिस परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रवक्ता नीला लिमये, युवा नेते शार्दुल कौशिक, महाराष्ट्र प्रदेश आरोपीवर महिला काँग्रेस सरचिटणीस चंद्रकला नायडू, परिवहन समिती सदस्य रणजित सिंह धालीवाल, महाराष्ट्र प्रदेश । महिला काँग्रेस सरचिटणीस रुपाली कापसे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव कविता कटकधोंड, माजी नगरसेविका सिंधुताई नाईक, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सिंथिया घोडके, विजय पाटील, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस सचिव ज्ञानदीप चंडोक, वाशी ब्लॉक कार्याध्यक्ष निलेश गाला, कोपरखैरणे ब्लॉक अध्यक्ष धोंडीराम पाटील, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस सचिव पुष्पा जैन, महिला काँग्रेस सदस्या शांता आदीसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.