रास्त भाव धान्य दकानातील ई-पॉज मशिन तात्काळ बंद करण्याची मागणी रास्त भाव धान्य दकानातील ई-पॉज मशिन तात्काळ बंद करण्याची मागणी


पनवेल (प्रतिनिधी) - राज्यातील रास्त भाव धान्य दुकानामध्ये बायोमेट्रीक पद्धतीचा अवलंब करून धान्य वितरण केले जाते. लाखोंच्या संख्येने कार्डधारक -पॉज मशिनवर आपले अंगठे लावत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा भिती राज्यातील, जिल्ह्यातील दुकानदारांनी व्यक्त केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर रास्त भाव धान्य दुकानदार व कार्डधारकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून व कोरोनाचा धोका टाळण्यासाठी रास्त भाव धान्य दुकानातील बायामेट्रीक पद्धत तात्काळ बंद करावी, अशी मागणी रास्त भाव धान्य दुकान वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष व शिवसेना तालुका संघटक भरत पाटील यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे. जगभरात कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना हा रोग जागतिक महामारी असल्याचे घोषित केले आहे. पनवेल (प्रतिनिधी) - राज्यातील रास्त भाव धान्य दुकानामध्ये बायोमेट्रीक पद्धतीचा अवलंब करून धान्य वितरण केले जाते. लाखोंच्या संख्येने कार्डधारक -पॉज मशिनवर आपले अंगठे लावत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा भिती राज्यातील, जिल्ह्यातील दुकानदारांनी व्यक्त केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर रास्त भाव धान्य दुकानदार व कार्डधारकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून व कोरोनाचा धोका टाळण्यासाठी रास्त भाव धान्य दुकानातील बायामेट्रीक पद्धत तात्काळ बंद करावी, अशी मागणी रास्त भाव धान्य दुकान वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष व शिवसेना तालुका संघटक भरत पाटील यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे. जगभरात कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना हा रोग जागतिक महामारी असल्याचे घोषित केले आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे राज्य सरकारमधील सर्व शासकीय व निमशासकीय विभाग, बँक आदी क्षेत्रात बायोमेट्रिक हजेरी बंद केलेली आहे. तसेच सावधानतेचा उपाय म्हणून देशभरातील मोबाईल कंपन्यांद्वारे सावधानतेच्या सूचना वजा इशारा दिला जात आहे. महाराष्ट्रातही सर्व शासकीय कार्यालयामध्ये बायोमेट्रीक मशीनवर अंगठा-बोट लावण्याचे ऐवजी रजिस्टरवर हजेरीच्या सह्या करण्याचे सूचना देत आहेत. मग धान्य दुकानदारांना लाखो कार्डधारकांची बोटे कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे राज्य सरकारमधील सर्व शासकीय व निमशासकीय विभाग, बँक आदी क्षेत्रात बायोमेट्रिक हजेरी बंद केलेली आहे. तसेच सावधानतेचा उपाय म्हणून देशभरातील मोबाईल कंपन्यांद्वारे सावधानतेच्या सूचना वजा इशारा दिला जात आहे. महाराष्ट्रातही सर्व शासकीय कार्यालयामध्ये बायोमेट्रीक मशीनवर अंगठा-बोट लावण्याचे ऐवजी रजिस्टरवर हजेरीच्या सह्या करण्याचे सूचना देत आहेत. मग धान्य दुकानदारांना लाखो कार्डधारकांची बोटे मशीनवर दाबून धरावी लागतात. अशाने दुकानदार बंधु भगिनींचे आरोग्य धोक्यात येत नाही का? जसे शासकीय व्यक्तींचे आरोग्य धोक्यात येते तसेच स्वस्त धान्य दुकानदार व कार्डधारकांचेही आरोग्य धोक्यात येते. शासनाने तत्काळ पावती पद्धतीने धान्य वाटपाचा निर्णय घेवून तसे आदेश संबंधित विभागाचे अधिकारी यांना तातडीने द्यावेत, आणि दुकानदार व कार्डधारकांचे आरोग्य धोक्यात येवू नये म्हणून युध्दपातळीवर उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. मशीनवर दाबून धरावी लागतात. अशाने दुकानदार बंधु भगिनींचे आरोग्य धोक्यात येत नाही का? जसे शासकीय व्यक्तींचे आरोग्य धोक्यात येते तसेच स्वस्त धान्य दुकानदार व कार्डधारकांचेही आरोग्य धोक्यात येते. शासनाने तत्काळ पावती पद्धतीने धान्य वाटपाचा निर्णय घेवून तसे आदेश संबंधित विभागाचे अधिकारी यांना तातडीने द्यावेत, आणि दुकानदार व कार्डधारकांचे आरोग्य धोक्यात येवू नये म्हणून युध्दपातळीवर उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.