नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक....! महापालिकेच्या दप्तरी २५३८ हरकती सूचना प्राप्त

निजली मुंबई प्रतिक्षिी)- शाळ्या __ नवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार दि ३१ जानेवारी २०२० हा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक असून ०९ मार्च २०२० रोजी । प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या प्रारुप मतदार यादीवर आपल्या हरकती व सूचना दाखल करण्यासाठी महापालिके तर्फे नागरिकांना आव्हान करण्यात आले होते. त्यानुसार १६ मार्च या अखेरच्या दिनांकापर्यंत प्राप्त अखेरच्या दिनांकापर्यंत प्रारुप मतदार यादी संदर्भात नागरिकांकडून २५३८ इतक्या हरकती व सूचना महापालिकेच्या दप्तरी प्राप्त झाल्या आहेत. यात तुर्भे विभागातून सर्वात जास्त म्हणजे _७६१ हरकती आल्या आहेत. प्रारुप मतदार यादीवर आपल्या हरकती व सूचना दाखल करण्यासाठी दि. ०९ मार्च ते १६ मार्च २०२० हा कालावधी जाहीर करण्यात आला होता. याबाबत देत महायलिका आयुक्ताहा निवशाळ महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक प्रसिध्दी करण्यात आल्याने जागरूक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सर्च इंजीनव्दारे स्वत:चे ऑनलाईन नाव शोधले. त्यानुसार नागरिकांकडून प्राप्त झालेल्या या हरकती, सूचनामध्ये नागरिकांकडून एकाच प्रकारच्या हरकतीचे दोन वा तीन अर्ज देणा-या नागरिकांची संख्या जास्त आहे. यामध्ये तुर्भे विभागात सर्वात जास्त म्हणजे ७६१ हरकतीचा समावेश आहे. त्याखालोखाल नेरुळ विभागात ४३४, घणसोली विभागात ३६७, कोपरखैरणे विभागात ३०२, ऐरोली विभागात २२२, वाशी विभागात २०९, दिघा विभागात १२४ व बेलापूर विभागात सर्वात कमी ११९ अशा प्रकारे एकूण २५३८ हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.