नवी मुंबई (प्रतिनिधी) - मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाजार आवारामध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याकरिता खा. राजन विचारे यांनी खासदार निधीतून रुपये पंचवीस लाख तसेच बाजार घटकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्याकरिता बाजार आवारामध्ये आर.ओ.प्लान्ट बसविण्याकरिता पंचवीस लाख असा एकूण ५० लाखांचा निधी दिला आहे. सदर निधीतून पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा नुकताच धर्मवीर संभाजी महाराज भाजीपाला बाजार संकुल येथे खा.राजन विचारे यांच्याप्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बाजार आवारातील व्यापारी बांधवांकडून खासदार राजन विचारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास जिल्हाप्रमुख विट्ठल मोरे, बाजार समिति सचिव अनिल चव्हाण, बाजार समितीचे सहसचिव अविनाश देशपांडे, बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित संचालक शंकर पिंगळे, संजय पानसरे व इतर मान्यवर तसेच बहुसंख्य व्यापारी व कामगार उपस्थित होते.
खासदार निधीतून बाजार समितीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे