नवी मुंबई (प्रतिनिधी)-वाशीयेथील नियोजित महाराष्ट्रभवनाकरीता राज्य शासनाने काल सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्येतरतूद करण्यात आल्याने यासंबंधी आपण शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याची प्रतिक्रिया आ.मंदा म्हात्रे यांनी व्यक्तकेली आहे ___ नवी मुंबई शहर हे एकविसाव्या शतकातील शहर म्हणून ओळखले जाते. सिडकोच्यावतीने नवी मुंबई शहराच्या सुनियोजित विकासाबरोबरच विविध राज्यांच्या भवनाकरीता भूखंड उपलब्ध करून दिलेले आहेत. नवी मुंबईतील वाशी येथे प्रमुख राज्यांच्या भवनाच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. सिडकोने ८000 स्क्वेअर मीटरचा भूखंड महाराष्ट्र भवनासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. परंतु १९९८ पासून या भूखंडावर एकही वीट रचली गेलेली नाही, याची नवी मुंबईकरांबरोबरच आपणासही खंत वाटत होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य नागरिक विविध कामानिमित्त मुंबईत येत असतात. साहजिकच मुंबईच्या जवळपास महाराष्ट्र भवनाची निर्मिती होणे गरजेचे आहे. सिडकोने भूखंड उपलब्ध करून दिला असला तरी निधी अभावी महाराष्ट्र भवनाचे बांधकाम सुरु होवू शकलेले नाहीमहाराष्ट्र भवनाच्या बांधकामाकरीता चालू अर्थसंकल्पीय वर्षात सरकारने निधी उपलब्ध केल्यास नवी मुंबईत महाराष्ट्र भवनाची सुसज्ज वास्तू उभी राहील, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आ.मंदा म्हात्रे यांनी केली होती. तसेच विधानसभेतून याबाबत शासन दरबारी पाठपुरावाकेला होता. त्यास आता यश आल्याचे आमंदा म्हात्रेयी सांगितले.
BOX
मनसेतर्फे पेढे वाटून आनंद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना नवी मुंबईमध्ये होणार असल्याची घोषणा केली. त्याबद्दल मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष सरकारचे आभार मानले आहेत. नवी मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांनी वाशी येथील फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. नवी मुंबई वाशी ३०ए,वाशी येथे २ एकरच्या भूखंडावर महाराष्ट्र भवन व्हावे, अशी मागणी नवी दरबारी पत्रव्यवहार करीत केली होती. हा भूखंड वाशी येथे महाराष्ट्र भवन साठी आरक्षित आहे. वाशी परिसरात केरळअरुणाचल प्रदेश या राज्यांची भवने मोठ्या प्रमाणात उभी असताना महाराष्ट्र भवनच असा सवाल करत मनसेने या भूखंडावर महाराष्ट्र भवन झाले पाहिजे असा प्रतिकात्मकरीत्या हाती कुदळ फावडे घेऊन महाराष्ट्र भवनचे भुमीपूजन केले होते व संचालक भूषण गगराणी यांच्या दालनात ही आंदोलन केले होते.