आ.गणेश नाईक यांनी केली पाहणी...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सर्वत्र कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्याने आ.गणेश नाईक यांनी काल नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयास भेट देतांनाच वाशी सेक्टर १४ येथील बहुउददेशिय इमारतीमधील विलगीकरण कक्षाची पाहणी केली. आ. गणेश नाईक यांनी यावेळी प्रथम संदर्भ रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे यांच्याकडून कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपायांची माहिती घेतली. तसेच कोरोना रोगावरील उपचारासाठीच्या व्यवस्थेचा आढावा घेत महापालिका आणि रुग्णालयांतील यंत्रणा सतर्क तत्पर असून सर्व आवश्यक उपाययोजना केल्याचे निरिक्षण नोंदवले. महापौर जयवंत सुतार, नगरसेवक डॉ.जयाजी नाथ, नगरसेविका नेत्रा शिर्के, माजी विरोधी उपस्थित होते. होर्डिंग, भित्तीपत्रे तसेच ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून ध्वनीमुद्रित संदेशातून कोरोनाची लक्षणे, त्यावरील उपचार आणि घ्यावयाची काळजी याची माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये प्रभागस्तरापर्यत देण्याची सूचना आ. गणेश नाईक यांनी प्रशासनास केली. प्रथम संदर्भ रुग्णालयात कोरोनावरील रुग्णांसाठी खास ३८ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून डॉक्टरांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. सेक्टर १४ येथील विलगीकरण कक्षात ३० खाटांचा स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असून त्यामध्ये देखरेखीसाठी ठेवण्यात येणाऱ्या संभाव्य संशयीत रुग्णांसाठी जेवणापासून सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या दोन्ही कक्षात अद्याप नवी मुंबईतील एकही रुग्ण दाखल झालेला नाही. परदेशातून परतलेल्या नवी मुंबईतील विविध भागातील एकूण ५२ व्यक्तींना त्यांच्या घरातच १४ दिवस वेगळे राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांची ओळख पटावी म्हणून त्यांच्या हातांवर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आलेला आहे. डॉ डी. वाय. पाटील रुग्णालय, एम.जी.एम. आदी खाजगी रुग्णालयांना सुचना करुन त्यामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. एपीएमसीतून १०० टन