१२ हजाराचा दड वसुल
नवी मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून विविध उपाय केले जातांनाच काही बाबींवर निबंध लादण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता सार्वजनिक ठिकाणी थुकणान्यास २५० रू. दंड आकारण्याच्या कारवाईसही सुरुवात झाली आहे. काल एका दिवसांत अशा प्रकारे ४८ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून रु.१२ हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. कोरोना श्वसनसंस्थेशी निगडीत आजार असल्याने सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये याकरिता महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी विशेष आदेशाव्दारे खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी विविध उपाय करतांनाच नागरीकांसाठी सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर कालपासून सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्यास आता २५० रू. दंड वसुलीची कारवाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय यांचे आदेशाच्या अनुषंगाने ___ तंबाखू व तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थ यांची विक्री करणारी सर्व दुकाने व पान टपऱ्या बंद ठेवण्यात यावेत, असे असेही निर्देश देण्यात आले आहेत. तर गर्दी होईल अशा सर्व कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही हे स्पष्ट करीत खाजगी कोचिंग क्लासेस सुरू असल्यास त्या ठिकाणी अटकाव करून त्या क्लास चालकांवर कारवाई करण्याचे सूचित केले आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये याकरिता याआधी नवी मुंबईतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा विषयक कार्यक्रमांची परवानगी रद्द केली असून महापालिका कार्यक्षेत्रातील अंगणवाडी, बालवाडी, सर्व सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, ग्रंथालये व अभ्यासिका, सिनेमागृहे, नाटयगृहे तसेच सर्व गृहनिर्माण संस्था, हॉटेल व सार्वजनिक ठिकाणी असलेले जलतरण तलाव आणि व्यायामशाळा व जीम, मॉल्स, महापालिका बहुउद्देशीय इमारतीमधील सभागृहे तसेच खाजगी मंगल कार्यालये व सभागृहे, हॉटेल्समधील बॅक्वेंट हॉल्स, सर्व क्रीडा संकुले, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे बंद राहतील असे घोषित केले आहे. त्याचप्रमाणे सर्व उदयाने, पार्क, गार्डन ही क्षेत्रेही प्रतिबंधीत करण्यात आली आहेत तसेच मैदाने तसेच मोकळया जागा या ठिकाणी नियोजित कोणत्याही प्रकारचे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम व महोत्सव यांच्या आयोजनास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आणून देत सार्वजनिक हिताच्या व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने याबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने वतीने करण्यात येत आहे.