अज्ञात व्यक्तीविरोधात गन्हा दाखल
नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबईतील शिवसेना नेते, महाराष्ट्र वडार मंडळाचे अध्यक्ष आणि महापालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांना ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अज्ञात व्यक्तीने __जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता असून ऐन निवडणूकीच्या तोंडावर चौगुले यांना खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. अज्ञाताने चौगुले यांना एक निनावी पत्र पाठवत ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची तसेच चौगुले यांच्याबरोबर असलेले महिलांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी रबाळे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नवी मुंबई शिवसेनेचे नेते असलेले विजय चौगुले हे नवी मुंबईच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ समजले जातात. ऐरोली परिसरासह नवी मुंबईच्या इतर भागात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग असून शिवसेनेसह इतर पक्षामधील नेते मंडळींशी त्यांचे चांगले संबंध असल्याचे सर्वश्रुत आहे. सध्या उंबरठ्यावर असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमिताने नवी __मंबईतील वातावरण पन्हा तापण्यास सुरवात झाली असून त्यातच चौगुले यांना खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांना आलेल्या पत्रात, खंडणी दिली नाही तर जीवे मारण्याची तसेच चौगुले यांच्याबरोबर असलेले महिलांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली आहे. दरम्यान, आलेल्या धमकीबाबत व फोटोंबाबत चौगुले यांना पत्रकारांनी विचारणा केली असता, माझे महिलांसोबत कोणतेही आक्षेपार्ह फोटो नसल्याचे स्पष्टीकरण विजय चौगले यांच्याकडून देण्यात आले आहे. तर निवडणूका तोंडावर असल्याने राजकीय सुडबुध्दीतून हा प्रकार झाला असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. याबाबत रबाळे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या पत्राद्वारे चौगुलेना खंडणीची धमकी देण्यात आली, ते पत्रदेखील पोलिसानी तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.