१० वॉर्डबॉयना महिन्याचे वेतन जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था अदा करणार


पनवेल (प्रतिनिधी) - पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात तात्पुरत्या सेवेत दाखल झालेल्या १० वॉर्डबॉयना एक महिन्याचे वेतन जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था अदा करणार असल्याची माहिती पनवेल महापालिका विरोधीपक्ष नेते तथा जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था, पनवेलचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांनी सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवा व सेवक वर्ग तत्पर असणे गरजेचे आहे. यादृष्टीने पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी रुग्णालयात जावून तेथील स्थितीची वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी सदर उपजिल्हा रुग्णालयात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे प्रितम म्हात्रे यांच्या लक्षात आले. शासनाच्या दिली. नियमानुसार भरती प्रक्रिया करून कामगारांना सेवेत हजर करून घेण्यास भरपूर कालावधी जाईल व अत्यंत घातक अशा कोरोना विषाणू संसर्गामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गहन प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात येताच, त्यांनी त्वरित आपल्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत १० वॉर्डबॉय उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवेसाठी देण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार काल १० वॉर्डबॉय यांची मुलाखत घेऊन त्यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवेत हजर करून घेतले. तसेच सध्या शासनाकडून त्यांच्या मानधनाची कोणती तरतूद होऊ न शकल्याने त्यांच्या सेवेच्या बदल्यात त्यांचे एक महिन्याचे वेतन जे एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था,पनवेल त्यांना अदा करणार असल्याची माहिती प्रितम म्हात्रे यांनी दिली.