ऐरोली (प्रतिनिधी) ऐरोली से-२० येथील चामुंडा नावाचे मोबाईल शॉप फोडून चोरटयांनी आतील विविध कंपन्यांचे १ लाख ४९ हजार ६४४ रुपयांचे ६३ मोबाइल फोन लंपास करण्याची घटना गतसप्ताहात घडली होती. या घटनेची उकल करण्यात रबाळे पोलिसाना यश आले असून याप्रकरणी एका चोरट्याला पोलिसांनी अटक करत त्याच्याकडुन १ लाख १९ हजार ६४६ रुपयांचे एकूण ५१ मोबाईल हस्तगत केले आहेत. यातील अटक आरोपीची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याच्याविरोधात विविध पाच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली असून त्याच्या इतर तिघा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी खबन्यांच्या माध्यमातून चोरट्यांची माहिती काढून एकाला जेरबंद करण्यात यश आले आहे.
ऐरोलीत मोबाईल शॉप फोडून मोबाईल लंपास करणारा अटकेत