मनसे अध्यक्ष राज ठाकरे याची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) - मुंबईत शिवाजी पार्कवर होणारा गुढी पाडव्यादिनीचा आपला मेळावा रद्द करतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्षा राज ठाकरे यांनी येत्या काही आठवड्यात होणाऱ्या नवी मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणूका व अन्य निवडणूका किमान सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, अशा निवडणुकांमध्ये बैठका होतात, मेळावे होतात, सभा होतात आणि मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करतात, त्यामुळे कोरोनामुळे नागरिकांच्या आरोग्याचा निर्माण झालेला प्रश्न पाहता या निवडणुका किमान सहा महिने पुढे ढकलाव्यात. __मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकृत पत्राद्वारे ही बाब मांडली आहे. या पत्रात मनसैनिकांसमोर गुढीपाडवा मेळाव्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे कि, दरवर्षीप्रमाणे गुढीपाडवा मेळाव्याच्या तयारीसाठी सर्वच महाराष्ट्र सैनिक जोरात आणि उत्साहात कि. कामाला लागले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून आम्ही सर्वजण कोरोना साथीच्या बातम्या वाचून जरा चिंतेत होतो परिस्थितीचा अंदाज घेत होतो. या परिस्थितीत गुढीपाडवा मेळावा कसा घ्यायचा असा प्रश्न आमच्या समोर होता. एक गोष्ट खरी की ही कोरोनाची साथ पसरू नये म्हणून आपण सर्वांनी जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. ती साथ रोखायची तर महत्त्वाचं काय तर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी टाळणं आणि, आपल्या मेळाव्याला तर भोठी गर्दी होते. तयारीसाठी महाराष्ट्र सैनिक ठिकठिकाणी बैठका घेतात, मेळावे आयोजित करतात आणि ह्या सर्वच ठिकाणी मोठ्या संख्येनं लोक जमा होतात, आज कोरोनाची साथ पसरू नये हे महत्वाचं आहे. या मेळाव्याला मोठया संख्येनं महाराष्ट्रभरातून लोक शिवतीर्थावर जमणार आणि त्यामुळे कोरोनाची साथ आटोक्यात येण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. आणि, म्हणूनच या वर्षीचा गुढीपाडवा मेळावा आपण रद्द करत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. राज्यातील नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षितता ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. महाराष्ट्र सरकारनंही याबाबतीत काही उपाययोजना सुचवल्या आहेत, पण त्या पुरेशा नाहीत मॉल्सथिएटर्स, जिम अशा गोष्टी बंद केल्या आहेत. शहरातील शाळाही बंद करायला सांगितल्या आहेत. मात्र मुंबईत प्रचंड गर्दीत रेल्वे लोकल्सनं लाखो लोक दाटीवाटीनं प्रवास करतात त्यावर काय उपाय? एसटी स्टॅण्डस, मंडई, बाजार इथे लोक एकत्र येत असतात त्यावर काय करणार? ज्यांचं हातावर पोट आहे अशांना तर रोज गर्दीत प्रवास करावा लागणारच ना? मग त्या बाबतीत सरकारने काही उपाय शोधले आहेत काय असा सवाल करत सरकारनंही उगाच तोंडदेखले उपाय करण्यापेक्षा कोरोनाची साथ आटोक्यात येईलच अशी ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच येत्या चार-सहा आठवड्यात राज्यात काही निवडणुका आहेत. यात काही महापालिकांच्याही निवडणुका आहेत.