नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई शहर वसण्यापूर्वीपासून बेलापूर हे अत्यंत महत्वाचे गाव असून येथील नागरिकांच्या विविध कार्यक्रमासाठी एक चांगली वास्तू उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी येथे केले. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १०६, बेलापूर गांव येथे उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय इमारतीचे उद्घाटन महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थानिक नगरसेविका पुनम पाटील, माजी नगरसेवक अमित पाटील आदी मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सदर बहुउद्देशीय इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर महापालिकेच्या वतीने ग्रंथालय सुरु करण्यात आले. या बहुउद्देशीय इमारतीस श्री राम मारुती सभागृह तसेच बेलापूर गांव येथील मासळी मार्केटला कै.सुभद्रा शिमग्या पाटील मासळी मार्केट अशा नामफलकाचे नुतनीकरण याप्रसंगी करण्यातत आले.
बेलापूरमधील बहुउद्देशीय इमारतीचे लोकार्पण