उरण (प्रतिनिधी) - जगभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणूने राज्यात मंगळवारी पहिला बळी घेतला. दुबईतून परतलेल्या ६४ वर्षीय रुग्णाचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारतर्फे कठोर पावले उचलत जनजागृती करण्यात येत आहे. मात्र उरणमध्ये अनेक बंदरे व पकल्प असतानाही कोणत्याही प्रकारची जनजागृती अथवा शासकीय अधिकाऱ्यांना माहिती विचारल्यास कोणताच अधिकारी वर्ग माहिती न देता उलट उपदेशाचे डोस पाजत, शासकीय कामात अडथळा आणत असल्याचा दावा करीत आहेत. इतर ठिकाणी जनजागृती होत असताना उरणमध्ये कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारची जनजागृती केली जात नसल्याचे दिसत आहे. 'कोरोना'ने जगाला कोंडीत पकडले असताना या आजारा बाबत कोणकोणती खबरदारी घ्यावी याची माहिती जनजागृती होत नसल्याने उरणच्या जनतेला माहिती होत नाही. कोणा संबंधित शासकीय अधीकारी वर्गातील कोणाकडे याबाबतची विचारणा केली असता, अधिकारी वर्ग उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. उरण परिसरात जेएनपीटी, डीपी वर्ल्ड, सिंगापूर पोर्ट, चौथे टर्मिनल व इतर अनेक छोटे-मोठे व्यवसाय आहेत. बंदरामध्ये येणारी परदेशातील जहाजे व व्यवसायाच्या निमित्ताने येणारी जनता यांच्यासाठी कोणतीही खबरदारी अथवा त्यांची कोणतीच चाचणी केली जात नसल्याचे समजते.
कोरोना संदर्भात उरणमध्ये जनजागृतीचा अभाव