महिला रिक्षा चालकासाठी वेगळा थांबा द्या!


कोपरखैरणे (प्रतिनिधी) - कोपरखैरणे रेल्वे टेशन येथे अबोली रिक्षा चालक संघटना सुरु करण्याबाबत हालचाली सुरु असून त्याअनुषंगाने अबोली रिक्षा चालक संघटनेच्या महिलांची बैठक संपन्न झाली. यावेळी महिलांना रिक्षा चालवत असताना येणाऱ्या अडचणी तसेच पुरुष रिक्षाचालकांचा होणारा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कोपरखैरणे येथे महिलांना पुरुषांच्या रांगेतच रिक्षा लावून व्यवसाय करावा लागत असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याचा पाढा वाचण्यात आला. त्यासाठी अबोली महिला रिक्षा चालकांसाठी वेगळा थांबा व्हावा अशी येथील महिलांनी मागणी केली. सदर बैठकीमध्ये कोपरखैरणे येथे अबोली रिक्षा चालक महिला संघटनेची स्थापना करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच या ठिकाणी संघटनेची स्थापना होणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी रिक्षा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी संघटना त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहिल असे आश्वासन दिले. या बैठकीला अबोली रिक्षा महिला संघटनेच्या उपाध्यक्षा सुलोचना भगत, शालिनी गुरव, खजिनदार ललिता राउत तसेच कोपरखैरणे येथील रिक्षा चालक महिला वनिता कचेकर, नलिनी पोल, मिनाली दसवंत, दिशा वाघमारे, पूजा कदरे, उषा केंद्रे, सुवर्णा चौधरी, देवशाहली नारोलीन आदि महिला उपस्थित होत्या.