हंड्यासाठी पत्नीचा छळ, पतीविरोधात गुन्हा दाखल

ऐरोली (वार्ताहर) - माहेरहन पैसे आणावेत या उद्देशाने शुल्लक कारणावरून पत्नीशी भांडण करून तिला वारंवार मारहाण करण्यासह मानसिक व शारीरीक छळ केल्याप्रकरणी पती विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज सुरेश गुप्ते, रा. चेंबूर असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून त्याच्याविरोधात पत्नी वर्षा हिने पोलिसात तक्रार नोंदविली आहे. सध्या घणसोलीत आईकडे राहणाऱ्या वर्षा हिचा विवाह चेंबुर येथील रामहरी चाळ येथे राहणाऱ्या राज सुरेश गुप्ते यांच्याशी वर्ष २०१४ मध्ये झाला. लग्नाचे वेळी वर्षा हिच्या आईने तिला १ तोळे सोन्याची चैन व ४ ग्रमची सोन्याची अंगठी स्त्रीधन म्हणुन दिले होते. लग्नानंतर सुरवातीला काही दिवस चांगले गेल्यानंतर घणसोली एमआयडीसी येथे हाउसकिपींगचे काम करणारा वर्षा हीच पती राज गुप्ते हा दारू प्राश्न करून रोज कामावरून घरी आल्यानंतर कोणत्याही किरकोळ कारणावरून तिला मारहाण करीत असे त्याबाबत तिने वेळोवेळी चेंबुर व टिळकनगर पोलीस ठाणे येथे पतीविरोधात तक्रारी दिल्या आहेत. मात्र त्यानंतरही राज गुप्ते याच्या कडून तिला माहेराहून पैसे आणण्यासाठी मारहाण करण्याचे प्रकार सुरूच होते. त्यामुळे या त्रासाला कंटाळून वर्षा मागील २ वर्षापुर्वी घणसोली येथील आपल्या आईकडे माहेरी राहण्यास आली. मात्र वर्षा ही आपल्या माहेरी असताना ती घरात एकटी असताना येऊन तिला मारहाण केली आहे. तसेच तिची सोन्याची चैन व अंगठी देखील पतीने घेऊन ती अदयापपर्यंत परत दिलेली नाही.असे असतानाच माहेराहून पैसे आणावेत या उद्देशाने पती राज गुप्ते याने शुल्लक कारणावरून भांडण करून वेळावेळी हाताने मारहाण करून मानसिक व शारीरीक छळ केला असल्याचे पत्नी वर्षा हिने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक डि. बी. ढुमे करत आहेत.