नवी मुंबई (नितीन पडवळ) - सरकारपातळीवरून महिला सुरक्षेसाठी निरनिराळी पावले उचलली जात असली तरी राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनात वाढ झालेली आहे. एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना पाहता नवी मुंबईत महिला असुरक्षित असल्याचा प्रश्न । उपस्थित होत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसांमध्ये महिलांच्या चार हत्येची प्रकरणे समोर आली आहेत. यासह महापे येथील महापालिकेच्या शाळेत एका संस्थेच्या संगणक शिक्षकाने शाळेत शिकणा-या ५०च्या आसपास विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा समोर आलेला प्रकार, रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर दोन तासांत तीन तरुणांनी दोनदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना, कामोठे यात भाजपच्या नगरसेविकेला लुटण्याचा झालेला प्रकार तसेच उलव्यात सोमवारी प्रभावती भगत नावाच्या महिलेचे भरदिवसा कारसह अपहरण करून तिची घडून आलेली हत्या, पनवेल तालुक्यात गतीमंद मुलीवर बलात्कार आदी नवी मुंबईतील घटना पाहता येथील महिलांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. या वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता नवी मुंबई पोलीस सध्या टीकेचे धनी होऊ लागले आहेत. कामोठे वसाहतीमधील भाजपच्या नगरसेविका कुसूम म्हात्रेयांना काही अज्ञात चोरट्यानी घेरून अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना नुकतीच रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे उघड झाले आहे. चक्क नगरसेविकेला कामोठे वसाहतीमधील भर रस्त्यात लुटण्याच्या या घटनेमुळे वसाहतीमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतनगरसेविका कुसूम म्हात्रे यांच्या गळ्यातील जवळपास ८ ते १० तोळे वजनाचे लाखो रुपयांचे सोने चोरट्याने लंपास केल्याचे सांगितले जात आहे. ___नगरसेविका कुसुम रवींद्र म्हात्रे ह्या आपल्या महिला कार्यकर्त्यांसोबत रविवारी पक्षाच्या कार्यक्रमासाठी मुंबई येथे गेल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर, खासगी गाडीने कामोठे वसाहती जवळील महामार्गावर त्या उतरल्या. यावेळी त्यांच्या सोबत ५ ते ७ महिला कार्यकर्त्या देखील होत्या.कामोठे हायवेवरून म्हात्रे आणि त्याच्या सोबतच्या महिला या पायी चालत आपल्या घरी परतत असताना याचवेळी काही अज्ञात चोरट्यांनी त्याच्या जवळ येऊन गळ्यातील सोन्याचे ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी म्हात्रे यांनी आरडाओरड केलीमात्र चोरटा नगरसेविका कुसुम म्हात्रे यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि चैन घेऊ न पसार झाला. दरम्यानआपल्याबाबतीत लुटीची ही घटना घडल्यानंतर नगरसेविका कुसुम म्हात्रे यांनी थेट कामोठे पोलीस स्टेशन गाठले. व घडलेला सर्व प्रकार तेथील पोलिसांना सांगितला. मात्र कमोठे पोलिसांनी ही घटना ऐकण्या व्यतिरिक्त काही केले नाही. चक्क तुम्ही तक्रार द्यायला उद्या सकाळी ११ वाजता या असा सल्ला देऊन घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नगरसेविका कुसुम म्हात्रे यांनी याबाबत बोलताना केला. घटना रविवारी ८ ते ९ च्या दरम्यान घडल्यानंतर देखील पोलिसांनी या घटनेची नोंद सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या नंतर का घेतली असा प्रश्न नगरसेविकेने विचारला आहे. उलव्यात सोमवारी भरदिवसा प्रभावती भगत (५०नावाच्या कारमध्ये बसलेल्या महिलेला अज्ञात मारेकऱ्याने कारसह पळवून नेऊन आणि नंतर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीप्रभावती भगत (५०) असे या महिलेचे नाव असूनत्यांच्याकडील दागिने लुटले गेले नसल्याने या हत्येच्या कारणाविषयी गूढ निर्माण झाले आहे. उरणच्या शेलघर भागात रहाणारे बाळकृष्ण भगत दुपारी प्रभावती यांच्यासह कारने उलवे सेक्टर-१९ मधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत गेले होते. कार बँकेबाहेर उभी करून आणि प्रभावती यांना कारमध्ये बसवून भगत बँकेत गेले. कारमधील एसी सुरू रहावा यासाठी भगत यांनी कारचे इंजिन सुरूच ठेवले होते. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने कारमध्ये शिरून कार वहाळच्या दिशेने पळवून नेलीप्रभावती यांची त्या व्यक्तीशी झटापट झाल्याने त्याने आपल्याकडील रिव्हॉल्व्हरने त्यांच्यावर एक गोळी झाडलीत्यानंतर कार वहाळ गावाजवळील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या पाठीमागील बाजूस सोडून मारेकऱ्याने पलायन केले. हा प्रकार शेजारील बांधकाम जागेवरील कामगारांनी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रभावती यांना बेलापूरच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या दोन घटनांपुर्वी उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेची हत्या नुकतीच घडून आली असून याप्रकरणी मायलेकींना पोलिसांनी अटक केली आहे. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत काही दिवसांपूर्वी घरोघरी डालडा विकणाऱ्या व नातेवाईकांपासून ताटातूट झाल्यानंतर मदतीची याचना करणाऱ्या एका तरुणीवर दोन तासांत तिघा नराधमांनी दोनदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना १८ फेब्रुवारी रोजी घडली आहे. घटनेतील पीडित तरुणीने ज्या ज्या तरुणांकडे मदत मागितली त्यांनीच तिच्यावर पाशवी बलात्कार केला. रबाळे पोलिसांनी या तिन्ही नराधमांना अटक केली असून यात एका रिक्षाचालकासह दोघे स्कुटीवरील तरुण अश्या तिघांचा समावेश आहे. यातील पीडित तरुणीला घाटकोपरहून ट्रेन पकडायची होती. मात्र ती ट्रेन पकडू शकली नाही. त्यानंतर दुसरी लोकल पकडून ही तरुणी मुंब्रा स्टेशनवर पोहोचली आणि रात्री स्टेशनवरच झोपली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ट्रेन पकडून ती दिवा स्थानकात पोहोचली. मात्र तिच्याकडे पैशाची कमतरता असल्याने तिने एका महिलेच्या मदतीने नाकातली नथ विकण्याचा प्रयत्न केला. मात्र संध्याकाळपर्यंत नथ विकल्या गेली नाही. त्यानंतर संध्याकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास तिने एका हॉटेलजवळून रिक्षा पकडली आणि स्टेशनकडे जायला निघाली. मात्र रिक्षा चालकाने ही रिक्षा महापे येथील एका जर्जर इमारतीत रिक्षा नेली आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला एका मंदिराजवळ सोडून पळून गेला. हा एक आघात तिच्याबाबतीत झालेला असतानाच स्कुटीवरून जाणाऱ्या दोघा तरुणांकडे तिने मदत मागितली असता, त्या नराधमांनीही तिच्या असहायतेचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. महापालिकेच्या महापे येथील शाळेतील विद्यार्थ्यांना खासगी कंपनीमार्फत संगणक प्रशिक्षण देणाऱ्या लोचन परुळेकर (३१) नावाच्या एका शिक्षकाने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकारही यापूर्वी उघडकीस आला आहे. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी आरोपीवर विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दरम्यान, शाळेत घडलेल्या या प्रकाराने शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा मुदा ऐरणीवर आला असून या निंदनीय घटनेमुळे विद्यार्थिनींसह पालक वर्गांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हत्या, बलात्कार या घटनांसह महिलांच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने हिसकावून नेण्याच्या घटनातही वाढ झाली आहे. दरम्यान , नवी मुंबई शहराची आयटी हब म्हणून ओळख सर्वदूर झाली असल्याने या शहरात कामानिमित्त विविध ठिकाणाहून येजा करणाऱ्या महिलांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र शहरात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांच्या बाबतीत घडलेल्या घट ना पाहता नवी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असुन महिलांची सुरक्षा लक्षात घेता पोलिसांनी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
नवी मुंबईत महिला असुरक्षित?