वर्क फ्रॉम होम'च्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्तांकडून 'माईंड स्पेस'ची तपासणी


नवी मुंबई (प्रतिनिधी) - साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आयटी कंपन्यांकरिता १७ मार्च २०२० रोजी आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशान्वये आय.टी. कपन्याच्या व्यवस्थापनांना केवळ अत्यावश्यक अधिकारी, कर्मचारी यांनाच कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगावे असे निर्देशित करण्यात आले असून इतर अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या निवासस्थानाहून काम करण्याची मुभा द्यावी असे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम याची अंमलबजावणी होत आहे कि नाही याची पाहणी करण्यासाठी काल महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी माईंड स्पेस आय टी पार्कला भेट देत त्याठिकाणची पाहणी केली. या भेटीत आयुक्तांनी कंपनी व्यवस्थापनाला अत्यावश्यक स्वरुपाचे काम असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच कामावर उपस्थित राहण्यास सांगावे व उर्वरित कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरून काम करण्याची मुभा द्यावी अश्या स्पष्ट सूचना केल्यायावेळी व्यवस्थापनाने अशाप्रकारे कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित आय.टी. संस्थांना देऊन काटेकोर अंमलबजावणी करू असे आश्वस्त केले. याशिवाय कार्यालयांमध्ये अधिकारी कर्मचारी यांच्याकरीता हँड सॅनिटायझर आणि मास्क पुरविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच कार्यालय परिसराचे दररोज निर्जंतुकीकरण करुन घ्यावे असेही सूचित करण्यात आले आहे. कोरोना विषाणू संसर्गातून पसरत असल्याने सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत आयटी पार्कमध्ये हजारोंच्या संख्येने विशेषत्वाने युवा कर्मचारी कार्यरत असल्याने आयटी कंपन्यांच्या व्यवस्थापनांनी अधिक दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केल्या.याप्रसंगी महापालिका आयुक्तांसमवेत उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे व इतर अधिकारी उपस्थित होते.


box


वर्क फ्रॉम होम'वर प्रश्नचिन्ह! 


आयुक्तांच्या या पाहणी दौन्यादरम्यान ठाणे माईंड स्पेस समोरील रोड वर कामगारांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आलेले चित्र पाहता नवी मुंबईतील आयटी पन्यामध्ये शासनाने सूचीत केलेली 'वर्क फ्रॉम होम'ची अंमलबजावणी होत आहे का? याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.