कलावंतांना प्रेरणा देणारी नवी मुंबई महापालिका - अभिनेत्री हेमांगी कवी COM


नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबई हे सर्वांना भूरळ घालणारे सुंदर शहर आहे अश्या शब्दात नवी मुंबई शहराचे कौतुक करतानाच नवी मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन कलावंतांना प्रेरणा देण्याचे केलेले काम ही अत्यंत प्रशंसनीय गोष्ट असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द मराठी अभिनेत्री हेमांगी कवी यांनी वाशीत केले. कलावंतांनी सतत शिकत राहिले पाहिजे असेही त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या नवी मुंबई महापौर चषक नृत्य व गायन स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यानंतर पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले कि, नवी मुबंईत अगदी सुरुवातीपासूनच मुळच्या ठाणे बेलापूर पट्टीत नाट्य, गायन व भजनी परंपरा मोठ्या प्रमाणावर जोपासली जात असून कलात्मक विकासाला वाव देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका विविध स्पर्धांचे आयोजन करीत असून नृत्य व गायन स्पर्धा हा त्याचाच एक भाग असल्याचे मत व्यक्त करीत नवी मुंबईतून शहराचा नावलौकीक वाढविणारे कलाकार निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला. गायन स्पर्धेचे परिक्षक म्हणून मनोगत व्यक्त करताना संगीतकार महेश ओगले यांनी प्रत्यक्ष सादरीकरणाच्या वेळी आपण जे काही सादर करतो त्यावर पारितोषिक अवलंबून असते असे मत व्यक्त केले. नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून मनोगत व्यक्त करताना नृत्य कलावंत व अभिनेते नकूल घाणेकर यांनी कलेमुळे माणुसकी जिवंत राहते असे प्रतिपादन केले. नृत्य करताना त्यामधील आशय समजून घेतला तर नृत्यातील हालचाली अर्थवाही होतील असेही मत त्यांनी नोंदविले. नवी मंबई महापौर चषक गायन स्पर्धेतील वैयक्तिक गायन प्रकारामध्ये खुल्या गटात अक्षय नायर तसेच लहान गटात समृध्दी जाधव यांनी महापौर चषक पटकाविला. समुह गायन प्रकारामध्ये खुल्या गटात संदेश कनिष्ठ महाविद्यालय यांनी तसेच लहान गटात संदेश विद्यालय यांनी महापौर चषक संपादन केला. नवी मुंबई महापौर चषक नृत्य स्पर्धेमध्ये वैयक्तिक नृत्य प्रकारात खुल्या गटात निकिता सोलंकी व लहान गटात आर्या मोरे हे महापौर लहान गटात आर्या मोरे हे महापौर चषकाचे विजेते ठरले. समुह नृत्य प्रकारात खुल्या गटात एन.डी.ए. नृत्य समुह व लहान गटात सिध्दीविनायक नृत्य कलामंदिर हे सपावन कला. महापौर चषकाचे मानकरी झाले. गायन स्पर्धेत १०४ व नृत्य स्पर्धेत १२७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामधून प्राथमिक फेरीत रुपाली मोघे (गायन) व सचिन पाटील (नृत्य) यांनी अंतिम फेरीसाठी गायक व नृत्य कलावंतांची निवड केली. त्यांची महाअंतिम फेरी होऊन प्रत्येक गटात प्रथम चार क्रमांक व एक उत्तेजनार्थ अशी पाच पारितोषिके रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रासह प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे प्राथमिक फेरीतील उत्तम सादरीकरण करणाया मात्र अंतिम फेरीत निवड न झालेल्या गुणवंत गायक व नृत्य कलावंतांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपर पारितोषिके प्रदान करण्यात आली. महाअंतिम सोहळ्याचे औचित्य साधून स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानच्या दिव्यांग कलावंतांनी सादर केलेल्या नृत्य ___ कलाविष्काराला रसिकांनी दाद दिली. नवी मुंबई हायस्कुलच्या दिली ज्युनियर के.जी. चे विद्यार्थी तसेच नमुंमपा शाळा क्र. ९१ मधील विद्यार्थी यांनीही सादर केलेल्या नृत्याला कौतुकाची दाद मिळाली. साप