मतदार याद्यांमध्ये घोळाची भाजपची तक्रार

महापालिका आयुक्तांना निवेदन



नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत घोळ घालण्यात आलाअसून अनेक मतदार संघातील नावे ही इतर मतदार संघात टाकण्यात आली आहे. मतदार यादीतील घोळ दूर करुन यादी पुर्ववत करावी, यासाठी भारतीय जनता पार्टीच्या शिष्ट मंडळाच्यावतीने पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. याबाबतचे निवेदन विरोधी पक्षनेता (विधानसभा), विरोधी पक्षनेता (विधान परिषद), उपायुक्त व निवडणुक अधिकारी, नमुंमपा यांना देखील देण्यात आले आहे. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्षा रामचंद्र घरत, माजी महापौर सागर नाईक, स्थायी समिती सभापती नवीन गवते, सभागृह नेते रविंद इथापे, जेष्ठ नगरसेवक डॉ.जयाजी नाथ, नगरसेवक देविदास हांडे पाटील, नगरसेवक प्रकाश मोरे, _ नगरसेवक शंकर मोरे, नगरसेवक लीलाधर नाईक, माजी नगरसेवक सुरेश शेट्टी, माजी नगरसेवक केशव म्हात्रे, प्रभाग समिती सदस्य विजय साळे, राजेश मढवी, सुदर्शन जिरगे, कैलास सुकाळे, शिरीष पाटील, सूदत्त दिवे, राजेश ठाकूर, राहुल शिंदे, किरण न्यायनीत आदी मान्यवर उपस्थित होते. याविषयी अधिक माहिती देताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत म्हणाले की, नवी मुंबई महानगरपालिकेच्या १११ प्रभागातील मतदार यादीत घोळ झाला आहे. ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. प्रभागातील नागरिकांची नावे ही येथे अनेक वर्षापासून वास्तव्यास असताना सुध्दा त्यांना इतर प्रभागात टाकण्यात आले आहे. पालिकेच्या यादीतील हा घोळ पालिका आयुक्त व निवडणुक आयोगाच्या निदर्शनास आणून दिला असून मतदारांना आपला अधिकार बजावता यावा याकरीता यादी पुर्ववत करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.