ऐरोली (प्रतिनिधी) - रबाळे एमआयडीसीतील प्लॉट नंबर-आर- ९६७ प्रोमास इंजिनीअरिग कंपनी समोर नवा रस्ता बनविण्याचे काम एमआयडीसीतर्फे मागील चार महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी दोन्ही बाजूने रस्ता खोदून ठेवण्यात आला असून पुढील काम सुरू करण्यास दिरंगाई होताना दिसत आहे. त्यातच या रस्त्याच्या व गटारांच्या कामासाठी थेट पाणी याचठिकाणी सोडले जात असल्याने या रस्त्यावर सध्या चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एकंदरीत एमआयडीसीच्या या भोंगळ कारभारामुळे चिखलात रस्ता कि रस्त्यात चिखल अशी अवस्था या मार्गाची झाली असून नव्याने रस्ता बनविण्याचे हे काम सध्या एमएडीसीत येणाऱ्या वाहनचालकांसाठी व कामगार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावरील चिखलाच्या या समस्येचा सर्वात जास्त त्रास एमआयडीसीत कामासाठी येणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना होताना दिसत असून चिखलातुन पुढे जाताना नागरिक घसरून पडण्यासह वाहने चिखलात रुतण्याचे प्रकार होऊ लागल्याने सर्वच त्रस्त झाले आहेत. या रस्त्यांचे काम एमआयडीसीला लवकर करायचे नव्हते तर, चांगला रस्ता उखडून ठेवला कशाला, असा संतप्त सवाल महेश देसाई यांच्यासह इतर त्रस्त नागरीकांकडून यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. रबाळे एमआयडीसीतील प्लॉट नंबर- आर- ९६७ प्रोमास इंजिनीअरिंग कंपनी समोर नवा रस्ता बनविण्याचे काम एमआयडीसीतर्फे डिसेंबर २०१९ पासून हाती घेण्यात आले महापालिका निवडणूकीतआहे. यासाठी दोन्ही बाजूने प्रशस्त असलेला चांगला रस्ता उखडून ठेवला. त्यावेळी हे काम जलद गतीने होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती, परंतु आजमितीस चार महिने होत आले तरी कामाला म्हणावी तशी गती नाही व त्यातच रस्ता चिखलमय झाला असल्याने वाहनचालकांसह कामगार विशेष करून महिलांना त्याचा जास्त त्रास होत आहे. जिथे नागरिकांना या चिखलमय रस्त्यावरून चालता येत नाही तिथे महिलांची काय अवस्था असेल याची कल्पना केलेली बरी. __खोदण्यात आलेल्याया मार्गावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे. अत्यंत कासवगतीनेसुरूअसलेल्याया कामामुळे हासर्वरस्ताधोकादायक झाला असून, काम तातडीने पूर्ण करा. सुरक्षित वाहतूक व्यवस्थेला मदत करा, अशी मागणी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सदरचे हे काम अत्यंत __कासवगतीने होणे अयोग्य असून नागरिकांना होणारा मोठा त्रास लक्षात घेता संबंधीत प्रशासनाने काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा नागरिकांसमवेत आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा कामगार नागरिकांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, एकंदरीत या प्रकारामुळे चिखलमय रस्त्यावरून वाहन चालविणे तर सोडा चालणेही अवघड झाले असून रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रबाळे एमआयडीसीत कामासाठी खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त