कर्नाळा आर्थिक घोटाळ्यात शेकाप नेते गप्प का? -आ.प्रशांत ठाकूर


पनवेल (प्रतिनिधी)- शेकापचे नेते निवडणुकीत पैसे खर्च करायला तयार आहेत, मग कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे पैसे का परत करीत नाहीत? असा सवाल आ.प्रशांत ठाकूर यांनी खांदा कॉलनी येथे कर्नाळा ठेवीदार संघर्ष समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला. माजी आमदार आणि शेकापचे नेते विवेक पाटील यांनी तब्बल ५१२ कोटी रुपयांहन अधिक आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप असून याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पार्श्वभूमीवर आ.प्रशांत ठाकूर यांनी । पत्रकार परिषदेतून आपली भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले, की या घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदार आणि खातेदारांना विवेक पाटील यांनी मोठ्या संकटात टाकले आहे. त्यामुळे ठेवीदारांवर ओढावलेले संकट आणि कर्नाळा बँकेत घोटाळा झाल्याची माहिती शेकापला माहित आहे का? असेल तर शेकापचे नेते या प्रकरणात का गप्प बसले आहेत, असा सवाल आ.प्रशांत ठाकूर यांनी केला. या प्रकरणात सत्तेचा दबावतंत्र वापरला जात आहे, असा आरोपही आ.प्रशांत ठाकूर यांनी केला. यावेळी आ.महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, युवा मोर्चाचे उत्तर रायगड अध्यक्ष मयुरेश नेतकर, कुंडलिक काटकर उपस्थित होते. शेकापक्षाच्या नेत्यांना कर्नाळा बँकेत ५१२.५४ कोटींचा भष्टाचार झाला अशी सहकार खात्याने तक्रार दिली हे माहित आहे का?, विवेक पाटील व शेकापच्या पदाधिकाऱ्यांना शेकापचा पाठिंबा आहे का? ते निष्पाप आहेत अशी शेकापक्षाची भूमीका आहे का?, नसल्यास शेकापक्ष विवेक पाटील व स्वतःच्या खात्यातून संगनमताने ठेवीदारांच्या पैशाची लूट करू देणाऱ्या शेकापच्या पदाधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार आहे?, विवेक पाटील यांनी कर्नाळा स्पोटर्स अॅकॅडमी व कर्नाळा चॅरीटेबल ट्रस्ट या संस्थांमध्ये बेनामी ६३ कर्ज खात्यातून पैसे वळवले असे पोलीस, सहकार खाते म्हणते, या पैशाचे नेमके काय झाले? आदी विविध प्रश्न उपस्थित करुन आ. प्रशांत ठाकूर यांनी उत्तरे देण्याचे आव्हान यावेळी शेकापला दिले. नवी मुंबईत शेकापचे अस्तित्व जवळपास नसल्यासारखे आहे, असे असतानाही आणि अनेक ग्रामपंचायतीचे, गावकीचे, संस्थांचे पैसे कर्नाळा बँकेत अडकले असतानाही शेकापच्या काही अस्तित्व पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबई येथे १११ जागा लढवण्याची घोषणा केली. मात्र गेल्या सहा महिन्यात प्रामुख्याने शेकापचे कार्यकर्ते, परंपरागत मतदार व ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी यांच्या ठेवींमुळे १७ शाखांपर्यंत ज्या कर्नाळा बँकेचा विस्तार पोहोचला, ती बँक बुडताना शेकापक्षाचे मौन हे आश्चर्यकारक आहे, असेही आ. प्रशांत ठाकूर म्हणाले. कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी १७ फेबुवारी रोजी पोलीसांनी एफआयआर दाखल केली असून या गुन्ह्यात विवेक पाटील, बँकेचे संचालक, संबंधीत अधिकारी व कर्जदार अशा एकूण ७६ पैकी किमान २० जण शेकापचे प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी असल्याचे आ. प्रशांत ठाकूर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. संचालक, स पैकी किमान