त्रिकूटाविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
घणसोली (वार्ताहर) - घणसोलीतील एका मिठाईच्या दकानात मिठाई खरेदीसाठी आलेल्या मुलांनी काजुकतली'ची मागणी केली. मात्र 'काजुकतली' मिठाई दुकानात शिल्लक नसल्याने ती न मिळाल्याचा राग मनात धरुन उलट दुकानदाराकडे पैशांची मागणी करुन त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचण्याचा प्रयत्न करुन सोन्याची चैन व दुकानातील सामानाचे नुकसान करण्यासह दकानमालकास शिवीगाळी करुन हाताबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी दुकानमालक भगवानलाल कुमावत यांच्या तक्रारीवरून त्रिकुटाविरोधात भादंवि ३२३, ३४, ३९३, ४२७, ५०४, ५०६ अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हकीकत अशी कि, घणसोली से-४ येथील रहिवाशी असलेले भगवानलाल किसनलाल कुमावत (वय- ३८) यांचे घणसोली से-३ येथे अंबिकादर्शन सोसायटीत मधुवन नावाचे स्वीटचे दकान आहे. दि. ०१ मार्च रोजी भगवानलाल कुमावत हे मोठा मुलगा भैरुलाल व कामगार तुलसीराम असे दुकानात असताना दोन अज्ञात मुले दकानात आली व आम्हाला एक किलो काजुकतली मिठाई पाहीजे अशी मागणी केली. मात्र दकानात काजुकतली मिठाई नसल्याचे दुकानमालक भगवानलाल कुमावत यांनी त्या मुलांना सांगताच सदर दोन मुलांना राग आला व सदर दोघा मुलांनी तुझ्या दुकानात काजूकतली नाही मग तुच आम्हाला पैसे दे असे बोलुन त्यातील एकाने भगवानलाल कुमावत यांच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचण्याचा प्रयत्न केला व दुसरा मुलगा रुहान भाईको बुलावो असे जोर जोरात ओरडु लागला त्यावर त्यांचा आणखी एक साथीदार बाहेरुन आला व त्यानंतर सर्वजनांनी मिळुन दुकानमालक कुमावत यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी झटापटीचा व ओरडण्याचा आवाज ऐकुन तेथील व्यापारी मंडळ असोशिएशनमधील काही नागरिक कुमावत यांच्या मदतीला धावून आले. त्यावेळी तिघांपैकी एकजण पळुन गेला व इतर दोन्ही मुलांना नागरिकांनी पकडले.