नवी मुंबईतील सर्व स्पा आणि मसाज सेंटर बंद

कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे निर्देश...



नवी मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या दि. ३१ मार्चपर्यंत नवी मुंबईतील सर्व स्पा आणि मसाज सेंटर बंद राहतील असे निर्देश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे सर्व सलून आणि ब्युटीपार्लर हे देखील २५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देशित केले आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी रस्ते व फुटपाथवर होणाऱ्या खाद्यपदार्थ आणि ज्युस विक्रीवर पुर्णत: निर्बंध घालण्यात आले आहेत.बेलापूर से. ११ येथील फुड किऑक्स आणि खाऊ गल्ली दि.३१ मार्च पर्यंत बंद राहील तर नेरुळमध्ये रेल्वे स्टेशन परिसर, सेक्टर १५, सेक्टर २० चा स्टेशन समोरील परिसर, डॉ.डी.वाय.पाटील. विद्यापीठ समोर सेक्टर १ शिरवणे परिसर आणि एल.पी.नाका परिसरातील सर्व दुकाने व फुड स्टॉल्स २५ मार्चपर्यंत बंद करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. माथाडी भवन, ग्रोहितंम मार्केट, मर्चेट सेंटर, जलाराम मार्केट, मसाला मार्केट से.१९ सी, महावीर मार्केट से.१८, ओ मार्केट से.२१, जनता मार्केट से. २३, पामबीच रोडवरील ऑटोमाबाईल शॉप .१९ सी, कॉर्पोरेट पार्क से.१८, से. १९ डी, सेक्टर ३० त्याचप्रमाणे भाजी आणि फळ मार्केट वगळता संपूर्ण .पी.एम.सी. मार्केट ३१ मार्च पर्यंत दिवसाआड बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोपरखैरणे स्टेशन समोरील से.५ येथील सर्व दुकाने आणि जागेचा वाणिज्य वापर २५ मार्च पर्यंत बंद करावयाचा आहे. सेक्टर १५ येथील गुलाब सन्स डेरी परिसर, से.१६ येथील फ्रेन्ड्स सर्कल एरीया, सेक्टर १४, से. २ आणि ३ याठिकाणची दुकाने आणि जागेचा वाणिज्य वापर ३१ मार्च २०२० पर्यंत बंद असणार आहे. घणसोली स्टेशन समोरील सेक्टर ३, ४ आणि ५ आणि नौसिल नाका येथील सर्व दुकाने व जागेचा वाणिज्य वापर ३१ मार्च पर्यंत बंद ठेवावयाचा आहे. तसेच ऐरोली स्टेशन (पूर्व व पश्चिम) परिसरातील सर्व दुकाने आणि जागेचा वाणिज्य वापर २५ मार्च पर्यंत त्याचप्रमाणे से.५ येथील माऊली संकुल, से. ८ ए येथील सिडको मोकळ्या प्लॉटवरील मार्केट ३१ मार्च पर्यंत दिवसाआड बंद राहणार आहे. गर्दीव्दारे होणारा कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने काही वर्दळीच्या क्षेत्रातील दुकाने व जागेतील वाणिज्य वापरावर प्रतिबंध घालण्यात येत असून याबाबतची कार्यवाही संबंधित विभागांच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी करावी अस निर्देश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले आहेत. याबाबत आवश्यक तेथे पोलीस विभागाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांच्या आरोग्य हितासाठी घेण्यात येणा-या या महत्वपूर्ण निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब


 


box



वाशी स्टेशन से.३० ए फूड किऑक्समधील सर्व दकाने व तेथील जागेचा वाणिज्य वापर तसेच सेक्टर १० येथील बिकानेर खाऊ गल्ली येथील सर्व दुकाने २५ मार्च पर्यंत तर वाशी से. ९, ९ए, १५, १६ मार्केट हे ३१ मार्च पर्यंत दिवसाआड बंद राहणार आहेत. सानपाडा से. ४ स्टेशन समोरील फूड किऑक्समधील सर्व दुकाने व तेथील वाणिज्य वापराची जागा ते ए.पी.एम.सी. मार्केट पर्यंतचे सर्व फुड व ज्युस स्टॉल्स २५ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.