मुंबई (प्रतिनिधी) - देशात उद्भवलेल्या कोरोना (कोवीड-१९या विषाणुच्या प्रसारावर आळा बसावा यासाठी दंतवैद्य क्षेत्रातील डॉक्टरांनी अनावश्यक व तातडीच्या नसलेल्या दंत सेवा ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवाव्यात. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना भारतीय दंत संघट (इंडियन डेंटल असोसिएशन) अध्यक्ष डॉ. रविंद्र सिंह यांनी दंतवैद्य चिकित्सकांना दिल्या आहेत. इंडियन डेंटल असोसिएशन (आय डी ए) या दंतवैद्य क्षेत्रातील डॉक्टरांसाठी काम करणाऱ्या संघटनेने सध्या कोरोना वायरस (कोविड-१९) च्या पार्श्वभूमीवर देशात उद्भवलेल्या विलक्षण परिस्थितीवर चिंता व्यक्त करत या विषाणुचा प्रसार अधिक होऊ नये यासाठी अनावश्यक व तातडीच्या नसलेल्या दंत सेवा ३१ मार्च २०२० पर्यंत स्वेच्छेने बंद ठेवण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
अनावश्यक दंतवैद्यकिय सेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन
• Dainik Lokdrushti Team