उद्या व रविवारी एपीएमसी मार्केट बंद


नवी मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने व सदर रोग प्रतिबंधक उपायोजनांसाठी गुरुवार आणि रविवार असे दोन दिवस एपीएमसी बाजारपेठ बंद ठेऊन स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये ग्राहकांनी गर्दी करु नये, यासाठी होलसेल व्यापाऱ्यांनी ग्राहकांना मार्केटमध्ये येण्याऐवजी फोनवरुन ऑर्डर देण्याचे आवाहन केले आहे. व्यापारी टेम्पोच्या माध्यमातून ऑर्डर के लेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचवतील. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दररोज ५० हजार लोकांची ये-जा सुरु असते. ही संख्या निम्म्याने कमी करण्याचा एपीएमसी बाजारपेठेचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.