संकष्टीनिमित्त श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी


उरण (प्रतिनिधी) - संकष्टी चतुर्थीनिमित्तराने कालनवी मुंबईसह पनवेल, उरणमधील गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. उरण बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री गणपती मंदिरात सुमारे तीनशे वर्षा पूर्वीची श्री गणेशाची मूर्ती ही काळ्या पाषाणाची घडवलेली असून कोरीव कामाचा अतिशय सुंदर अविष्कार मानला जात आहे. तसेच अष्टविनायक मूर्तीची स्थापन करण्यात आली आहे. शहर व परिसरातील भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. तसेच चिरनेर येथील श्री महागणपती दर्शनासाठीही भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. चिरनेर येथील श्री महागणपती दर्शनासाठी असंख्य भाविक दूरवरुन येत असतात. नवी मुंबईतूनही काही भाविक श्रींच्या श्रध्देपोटी पायी चालत जात श्रीचे दर्शन घेत असतात. नवी मुंबईतील शिरवणे तसेच इतर ठिकाणच्या मंदिरांमधील श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावल्याचे दिसून आले.