रा.फ.नाईक विद्यालयाने पटकावला जिल्हास्तरीय चषक..
नवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्यस्तरीय निमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेमध्ये व्यावसायिक पुरुष गटात नवी मुंबई महापालिकेच्या संघाने बलाढ्य मानल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या संघावर १ डाव ७ गुणांनी मात करीत ५१ हजार रक्कमेसह राज्यस्तरीय महापौर चषक पटकाविला. मध्य रेल्वेच्या संघाला उपविजेतेपदाचा चषक ३१ हजार रक्कमेसह प्रदान करण्यात आला. मुंबई महापालिकेचा संघ २० हजार रक्कमेच्या तृतीय क्रमांकाचा तसेच पश्चिम रेल्वेचा संघ १५ हजार रक्कमेसह चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. जिल्हास्तरीय व्यावसायिक महिला गटात रा.फ.नाईक विद्यालय कोपरखैरणेच्या संघाने शिवभक्त विद्यामंदिर बदलापूर या नामांकीत संघाला ४ गुणांनी पराभूत करीत महिलांचा जिल्हास्तरीय महापौर चषक २१ हजार रक्कमेसह स्विकारला. शिवभक्त विद्यामंदिर बदलापूर संघाला रू. १५ रक्कमेचे पारितोषिक व उपविजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेचे शाहू महाराज विद्यालय आंबेडकर नगर, राबाडे हे तृतीय क्रमांकाच्या १० हजार पारितोषिक रक्कमेचे व ग्रिफीन जिमखाना कोपरखैरणे चतुर्थ क्रमांकाच्या ५ हजार रक्कमेचे मानकरी ठरले. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या क्रीडांगणावर तीन दिवस ही स्पर्धा घेण्यात आली. नवी मुंबई महापौर चषक पाचव्या निमंत्रीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी याप्रसंगी महापौर जयवंत सुतार यांच्यासमवेत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका लता मढवी, महापालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव व अभिलाषा म्हात्रे, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या सह सचिव गंधाली पालांडे, मुंबई खो-खो असोसिएशनचे सचिव सुरेंद्र विश्वकर्मी, स्पर्धा निरीक्षक राजन देवरुखकर व किशोर पाटील, श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेश नाईक, रा.फ. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य थळे, पंच। प्रमुख विरेंद्र भुवड, मयुर पालांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेमध्ये व्यावसायिक पुरुष गटात नवी मुंबई महापालिकेच्या संघासह मुंबई महापालिका, पश्चिम रेल्वे, बँक ऑफ । इंडिया, मुंबई पोलीस, साईकृष्ण इलेक्ट्रीक, महाराष्ट्र महावितरण कंपनी व मध्य रेल्वे असे आठ बलाढ्य संघ सहभागी झाले होते. जिल्हास्तरीय व्यावसायिक महिला गटात रा.फ.नाईक विद्यालय, राजर्षी शाहू महाराज नमुंमपा विद्यालय, ज्ञानविकास विद्यालय, विहंग अॅकॅडमी, शिवभक्त विद्यामंदीर, ग्रिफीन जिमखाना, नमुंमपा शाळा . ४१ व फादर अॅग्नेल हे आठ नामांकित संघ सहभागी झाले होते. राज्यस्तरीय पुरुष गटात नवी मुंबई महापालिकेचा संकेत कदम २७ फेब्रुवारीच्या तसेच मध्य रेल्वेचा मिलींद चावरेकर २८ फेब्रुवारीच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला. जिल्हास्तरीय महिला गटात नवी मुंबई महापालिका शाळा क्र. ४१ आडवली भूतावलीची संस्कृती पाटील ही २७ फेब्रुवारीच्या तसेच नमुंमपा राजर्षी शाहू महाराज विद्यालय आंबेडकर नगर राबाडेची अश्विनी मोरे ही २८ फेब्रुवारीच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडूची मानकरी ठरली.