बाधकाम व्यवसाय पन्हा अडचणीत

नवी मुंबई (प्रतिनिधी) - बांधकाम व्यवसायाला गेल्या काही वर्षांत लागलेले मंदीचे ग्रहण सुटण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. गेल्या किमान ३ वर्षापासून आर्थिक मंदीमुळे या व्यवसायाला आलेली मंदीतून काही सणांच्या सावरण्याचा प्रयत्न बांधकाम व्यावसायिकांकडून केला जात आहे. त्याअनुषंगाने येत्या गुढीपाडव्यापासून पाडव्याचा मुहूर्त साधत मंदावलेल्या गृहखरेदीला थोडीफार चालना देण्याच्या प्रयत्न व्यावसायिकांचा होता. मात्र कोरोनामुळे आता बांधकाम व्यावसायिकांना कोरोनामुळे धक्का बसण्याची चिन्हे आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेले संभाव्य आर्थिक संकट, प्रवासावर आलेले निर्बंध, लोकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण अशा अनेक कारणांमुळे केवळ गृहखरेदीच नाही, तर व्यावसायिक जागांच्या खरेदी- विक्रीचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून विशेषत: मुंबईत होणारे भाडेपट्ट्यांचे करारही लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे; दुर्दैवाने तसे घडले तर या व्यवसायाला आणखी धक्का बसण्याची चिन्हे आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेले संभाव्य आर्थिक संकट, प्रवासावर आलेले निर्बंध यासह घर खरेदी मंदावण्यामागे अन्य काही कारणांप्रमाणेच कोरोनामुळे लोकांमध्ये निर्माण झालेली भीतीचे वातावरण हे एक मानले जात आहे. आत्यंतिक गरजेशिवाय लोक घराबाहेरही पडण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे चित्र आहे. परिणामी गृहखरेदीच नाही, तर व्यावसायिक जागांच्या खरेदी-विक्रीचे आणि __आंतरराष्ट्रीय स्तरावरून विशेषत: मुंबईत होणारे भाडेपट्ट्यांचे करारही लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम गृहसंकुलांची बांधकामे होण्याच्या तुलनेत घरांना मागणी होण्याची शक्यता धुसर बनली आहे. विशेष म्हणजे बांधकाम व्यावसायिकांना राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून मोठ्या सवलतींची आशा होती. मात्र, मुद्रांक शुल्कात अवघी एक टक्के सवलत जाहीर झाल्यानंतर बहुतांश जणांचा भ्रमनिरास झाला आहे. परंतु, तरीही ही कपात आणि काही आकर्षक सवलती जाहीर करून गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी- विक्रीच्या व्यवहारांत तेजी आणण्याचे प्रयत्न बांधकाम व्यावसायिकांकडून केले जाणार होते. मात्र, कोरोनाच्या भीतीचे सावट सर्वत्र पसरल्याने अनेकांनी घर खरेदीचा विचार मागे टाकला आहे. व्यावसायिक बांधकाम क्षेत्रात ज्या मार्केटिंग कंपन्या आहेत, त्यांतील टेलिकॉलर्स संभाव्य ग्राहकांना फोन करीत आहेत. मात्र, कोरोनाचे कारण देत अनेक जण घर खरेदीत स्वारस्य दाखवित नसून गृहप्रकल्पांना भेट देण्याचे प्रमाणही रोडावल्याची माहिती हाती मिळते. आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून व्यावसायिक मालमत्ता भाडेपट्ट्याने घेण्याचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवासाला निर्बंध आल्यामुळे येत्या काही महिन्यांत अपेक्षित असलेले हे व्यवहारही लांबणीवर पडणार आहेत. त्याशिवाय आर्थिक मंदीपाठोपाठ कोरोनाचे दुष्परिणाम जर जागतिक अर्थव्यवस्थेला सोसावे लागले तर या व्यावसायिक मालमत्तांचीसुद्धा कोंडी होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.