मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक... ८७.२१ टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क


नवी मुंबई (प्रतिनिधी)- राज्यातील ३०५ बाजार समिती व ६२५ उपमार्केटची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक काल पार पडली. काल झालेल्या या निवडणुकीसाठी सकाळपासूनच । उत्साहाचे वातावरण पहायला । मिळाले. या मतदान प्रक्रियेत राज्यभर ९२.५७ टक्के तर नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पाचही मार्केटमध्ये ८७.२१ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्यामकांत साळूखे यांनी दिली. राज्यातील सहा महसुली विभागांतून बारा शेतकरी प्रतिनिधी या समितीच्या संचालक मंडळावर निवडून येणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातील बड्या राजकीय नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याचे चित्र निवडणुकी दरम्यान पाहावयास मिळाले. ही निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी नवी मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांनी जय्यत तयारी केली होती. एकूण २४ संचालक पदापैकी सहा संचालक हे राज्य शासनाकडून नाम निर्देशित केले जाणार आहेत. १८ संचालक हे मतदान प्रक्रियेद्वारे निवडून येणार आहेत. यात सहा महसूल विभागातून शेतकरी प्रतिनिधी आणि तुर्भे येथील पाच घाऊक बाजारांतून प्रत्येकी एक संचालक निवडला जाणार आहेया पाच बाजारात शेतमालाची चढउतार करणारे हमाल माथाडी तोलारी यांच्यामधून एक प्रतिनिधी संचालक म्हणून निवड केला जाणार आहे. पाच बाजारापैकी फळ बाजारातुन माजी संचालक संजय पानसरे यांची, माथाडी कामगारांमधून संचालक म्हणून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची बिनविरोध निवड यापूर्वीच जाहीर झालेली आहे. राज्यात सर्वाधिक आर्थिक उलाढाल असलेल्या नवी मुंबईतील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची गेली दहा वर्षे निवडणूक झालेली नव्हतीत्यामुळे शासनाकडून त्यावर प्रशासक नेमून कारभार हाकलला जात होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेमुळे राज्य सरकारला एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक घेणे क्रमप्राप्त झाले होते. त्यानुसार सहकार विभागाच्या मार्फत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवली गेली महाविकास आघाडान एकात्रतपण लढविला. तर भाजपने या निवडणूकीत लक्ष केंद्रीत केले असले तरीही त्यांना पॅनेल तयार करता आले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना या पक्षांनी मिळून पॅनेल तयार करून ते या निवडणुकीला सामोरे गेले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण संचालकांपैकी सहा महसूल विभागात प्रत्येकी दोन शेतकरी प्रतिनिधी, पाच मार्केटमधील प्रत्येकी एक व्यापारी प्रतिनिधी, एक कामगार प्रतिनिधी अशी १८ जणांची मतदानाने निवड होणार आहेयात कांदा बटाटा लसण, भाजी. फळ. धान्य आणि मसाला बाजारातून प्रत्येकी एक संचालक राहणार असून या बाजारात गेली अनेक वर्षे काम करणारे माथाडी, हमालकामगारांमधून एक संचालक निवडला जाणार आहे. पाचही बाजारांवर महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संघटनेचे वर्चस्व आहे. सहा संचालक हे राखीव संवर्गातून राज्य शासनाकडून नियुक्त केले जाणार असून दोन संचालक हे मुंबई व नवी मुंबई पालिकेमधून नियुक्त होणार आहेत. सहा महसूल विभागमधून १२ शेतकरी प्रतिनिधी बाजार समितीमधून पाच व्यापारी प्रतिनिधी व एक कामगार प्रतिनिधी निवड मतदानाने करायची आहेप्रत्येक महसूल विभागातून २ सदस्यांची निवड केली जाणार असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक कार्यलयात मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. एकूण ३४ जिल्हयामध्ये मतदान घेण्यात आले. यात व्यापारी प्रतिनिधीची निवड करण्यासाठी मुंबई एपीएमसीत अतिरिक्त भाजीपाला मार्केट,दाना मार्केट,कांदा बटाटा मार्केट व मसाला मार्केटमध्ये मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. मुंबई बाजार समितीच्या व्यापारी प्रतिनिधी निवडण्यासाठी अडते,व व अ वर्ग खरिदारांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. एकूण १० हजार ९५७ मतदार असून यांपैकी फळ व कामगार मतदारसंघातील निवड बिनविरोध झाली आहे. तर उर्वरित सदस्यांची निवड करण्यासाठी काल मतदारानी आपला मक्तदानाचा हक्क बजावला. दरम्यान, सोमवारी या निवडणुकीचा निकाल बाहेर पडणार असल्याने सर्वांचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.