नवी ममुंबई (प्रतिनिधी) - कोरोना व्हायरस संसर्गाच्या प्रसारास प्रतिबंध करणेकरिता नवी मुंबई महापालिका स्तरावर शिघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली असून, करोना व्हायरस बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच विविध माध्यमाद्वारे नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल कोरोना व्हायरस संसर्गाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिकेने करोना व्हायरस संसर्ग नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. तसेच नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी गरज असेल तरच प्रवास करावा, तसेच बाहेरगावी जाणारा प्रवास शक्यतो टाळणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील वेगवेगळया टुर्स ट्रॅव्हल्स एजन्सींनी पर्यटनसाठी परदेशात जाण्याच्या सर्व सहली रद्द कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत. तसेच नवी मुंबई महापालिका कार्य क्षेत्रातुन सदयस्थितीत किती नागरिक पर्यटन किंवा इतर कारणाकरिता बाहेरगावी गेले याची माहिती घेण्यात येवुन, ते नवी मुंबई महापालिका कार्य क्षेत्रातील त्यांच्या वास्तव्याच ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यामध्ये लक्षणे आढळुन आल्यानंतर ___त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. तसेच मॉल्स, हॉटेल्स, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक शौचालये, सार्वजनिक ठिकाणे, गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठा, ए.पी.एम.सी. मार्केट या ठिकाणी स्वच्छता राहिल याबाबत दक्षता घेणेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे आले. नवी मुंबई महापालिका कार्य क्षेत्रात सार्वजनिक रु ण ल य , व 1 शी; डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालय व माता बाल रुग्णालय-बेलापुर येथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नवी मुंबई महापालिका कार्य क्षेत्रातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना स्वंयसेवा तत्वावर रुग्णालयीन सेवा पुरविणेबाबत आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात आवश्यकता भासल्यास रुग्ण खाटा संख्येत वाढ करण्याबाबत आवश्यक ती काळजी घेण्यात आलेली आहे. गरज भासेल त्यावेळी करोना व्हायरस संसर्ग प्रतिबंध करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व स्तरावर उपायायोजना के लेल्या आहे त. त्याच प्रमाणे रुग्णालयीन कर्मचान्यांना याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कोरोना व्हायरस संसर्ग प्रतिबंधासाठी... नवी मुंबईत शिघ्र कृती दलाची स्थापना