निवृत्ती वेतन धारकांनी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाती उघडण्याचे आवाहन

ठाणे (प्रतिनिधी) - राज्य शासन निर्णयानुसार सर्व निवृत्ती वेतन धारकांनी राष्ट्रीयकृत बँकामध्येच त्यांची खाते उघडणे आवश्यक आहे. तरी ठाणे जिल्ह्यातील ज्या निवृत्तीवेतन धारकांची खाती राष्ट्रीकृत बँकांमध्ये नाहीत त्यांनी जिल्हा कोषगाराशी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर यांनी केले आहे. निवृत्तीवेतन धारकांनी शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्यांची बँक खाती त्यांच्या सोयीच्या दृष्टीने खाजगी अथवा सहकारी क्षेत्रातील बँकामध्ये उघडली आहेत.परंतू निवृत्तीवेतन बँक खाती राष्ट्रीयकृत बँकामध्येच उघडणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत बँकाची यादी खालील प्रमाणे भारतीय स्टेट बँक, सिंडीकेट बँक, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोशन बँक, आलाहाबाद बँक, इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक या बँकामध्ये निवृत्ती वेतनधारकांनी आपली खाती उघडावी तसेच नवीन उघडलेल्या निवृत्तवेतन बँक खात्याच्या पास बुकच्या प्रथम पृष्ठाची झेरॉक्स प्रत, आधार कार्ड, पॅनकार्ड च्या प्रती व मोबाईल नंबर कोषगार कार्यालयात जमा करावे जेणेकरुन सदर माहिती निवृत्तवेतन प्रणालीमध्ये अध्यावत करता येईल असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ठाणे राजेश भोईर यांनी केले आहे.