पनवेल (प्रतिनिधी) - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव विरोधात पनवेल शहर पोलिसांनी सतर्कता दाखवून पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच सेनीटायझरने हात धुवून आतमध्ये पाठविण्यात येत होते. गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा धसका सर्वांनीच घेतला आहे. शाळा, कॉलेज, मॉल विविध कार्यक्रम शासनातर्फे बंद ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी २४ तास कर्तव्य बजावित असणाऱ्या पोलिसांना स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य तसेच पोलीस ठाण्यात येणारे तक्रारदार व इतर कामासाठी येणारा नागरिक यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेण्याच्या उद्देशाने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांनी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच एक कर्मचारी तैनात ठेवला असून तो आतमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सेनिटायझरने हात धुवूनच आत पाठवितो. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्याच्या सर्व अधिकारी व कर्मचारी सुद्धा नाकाला रुमाल किंवा मास्क लावूनच काम करताना दिसून येत आहेत.
पनवेल शहर पोलिसांची कोरोना विषाणू विरोधात सतर्कता
• Dainik Lokdrushti Team