नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेने नियमित फायर ऑडिट न करणाऱ्या शाळांना नोटीस बजावल्या असल्याने नियमित फायर ऑडिट न करणाऱ्या अश्या शाळांचे धाबे दणाणले आहे. नवी मुंबईतील काही शाळांचा नियमीत फायर ऑडिट विना कारभार सुरु होता, या प्रकाराने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुदा ऐरणीवर आला होता. सदरची ही गंभीर बाब लक्षात घेऊन ३० जानेवारी २०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या एका शिष्टमंडळाने महापालिका शिक्षण अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना नवी मुंबईतील नियमीत फायर ऑडिट न करणाऱ्या शाळांची यादी सादर करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला गांभीर्याने न घेणाऱ्या अश्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी मनविसेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी केली होती. या मागणीची दखल घेत नवी मुंबईतील शाळांना शिक्षण विभागातर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासन निर्णय क्र. | पीआरई-२००९/प्र.क्र.२९५/प्र.शि.-१, दि.२७ नोव्हेंबर २००९ व महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा उपाययोजना २००६ व २००९ नुसार महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय, तसेच संस्थांनी आपल्या इमारतीमध्ये अग्निशामक यंत्र बसविणे तसेच आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा अद्यायावत ठेऊन वर्षातून दोन वेळा त्याची नियमित तपासणी करणे फायर ऑडिट / इमारतीच्या स्ट्रक्चरल पैलूंचे निराकरण करणे बंधनकारक आहे. परंतु नवी मुंबईतील बहुतांश शाळांमध्ये अग्निशामक यंत्र अद्यापही बसविण्यात आल्या नाहीत. तसेच काही शिक्षण संस्थांनी वर्षानुवर्षे संबंधित फायर ऑडिट केलेले नव्हते अशा जवळपास १५० शाळांची यादी मनविसेतर्फे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे सादर केली होती व सदर शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच याबाबतीत सतत पाठपुरावा करून शिक्षण अधिकारी यांना वेळोवेळी धारेवर धरत या गंभीर विषयाबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपशहर अध्यक्ष संपरित तुर्मेकर व शहर सचिव निखिल गावडे यांनी दिला होता. त्यानुसार मनविसेच्या प्रयत्नांना यश आले असून मनविसेच्या दणक्यानंतर शिक्षण विभागातर्फे नवी मुंबईतील सर्व शाळांना अग्निशमन यंत्रणा बसविणे व नियमित फायर ऑडिट करण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या नोटीशीनंतरही शाळांनी प्रकरण गांभीर्याने न घेतल्यास पुढची धडक कारवाई शाळांवर करण्यात येईल असा इशारा मनविसेच्या शिष्टमंडळाने दिला आहे,यावेळी शिष्टमंडळात उपशहर अध्यक्ष -दशरथ सुरवसे, शहर सचिव प्रेम दबे, सहसचिव निखिल थोरात, प्रशांत पाटेकर आदी उपस्थित होते.
फायर ऑडिट न करणाऱ्या शाळांना महापालिकेने बजावली नोटीस