ऐरोली (प्रतिनिधी) - रस्ता वाहतुकीचे नियम नागरीकानी पाळावे व नागरिकांना वाहतूक विषयक नियमांची माहिती मिळावी याहेतूने आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त ठाणे बेलापूर रोडवर काल एक्सपेंड पॉलीमर सिस्टिम पर. लिमिटेड व इतर विविध कंपन्यातर्फे जनजागृतीपर रॅली ज्ञात आली होती. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरीकांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रॅलीप्रसंगी सहभागी नागरीकानी रस्ते सुरक्षाविषयक फलक हाती घेऊन व घोषणा देऊन जनजागृती केली. यात प्रामुख्याने हेल्मेट वापरा, अति घाई संकटात नेई, अती वेग आवरा जीवाला सावरा, नियमांचे पालन करा, अश्या घोषणा देत जनजागृती करण्यात आली.
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त ठाणे-बेलापूर मार्गावर रॅली