कोरोनामुळे अधिवेशन शनिवारी गुंडाळणार

मुंबई (प्रतिनिधी)- कोरोनाची व्याप्ती वाढत असताना लोक प्रतिनिधी व अधिकारी अधिवेशनाच्या कामात अडकून पडू नयेत यासाठी राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक आठवडा आधीच म्हणजे उद्या, शनिवारी गुंडाळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यात कोरोनाची लागण झालेले दहा रुग्ण आढळून आले असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. सरकारने आवश्यक ते सर्व खबरदारीचे उपाय योजले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जत्रा, मेळावे व गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन करतानाच आयपीएलबाबत परिस्थिती पाहन दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.