प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित करा


आ.गणेश नाईक यांची विधीमंडळात मागणी


सर्वेक्षणानंतर निर्णय घेण्याचे शासनाचे उत्तर


मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गावठाण आणि विस्तारित गावठाण क्षेत्रात गरजेपोटी बांधलेली बांधकामे नियमित करण्याची आग्रही मागणी आ.गणेश नाईक यांनी काल विधी म ड ळ । द य अधिवेशनादरम्यान तारांकित प्रश्नाद्वारे केली. यावेळी बांधकामांचे सर्वेक्षण सुरु असून तेपूर्ण झाल्यावर याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे लेखी उत्तर सरकारतर्फे देण्यात आले असता या सर्वेक्षणाचा हेतू प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या बांधकामांचा मालकी हक्क देणे हाच असला पाहिजे, असे आ. गणेश नाईक यांनी स्पष्ट केले. गरजेपोटीची बांधकामे नियमित करावीत, अशी मागणी प्रकल्पग्रस्त, प्रकल्पग्रस्तांच्या संघटना आणि येथील लोकप्रतिनिधी सातत्याने करीत आहेत. शासनाने प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यासाठी क्लस्टर योजना जाहिर केली मात्र या योजनेत अनेक त्रुटी असल्याने ग्रामस्थांनी या योजनेस विरोध दर्शविला आहे. ग्रामस्थांनी या योजने संदर्भात दिलेल्या सुचना आणि हरकतींचा विचार करुन त्यांच्या हिताची योजना शासनाने तातडीने आणावी, अशी मागणी आ. गणेश नाईक यांनी केली आहे.


box


प्रकल्पग्रस्तांच्या संघटनांनी केलेल्या मागणीनुसार सध्या जिल्हाधिकारी ठाणे आणि रायगड यांच्या मदतीने सिडको गरजेपोटीच्या बांधकामांचे सर्वेक्षण करीत आहे. या सर्वेक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर ही बांधकामे नियमित होण्याच्या अनुशंगाने शासनाकडून आवश्यक निर्णय घेण्यात येणार आहे, असे उत्तर शासनाच्या वतीने आ. गणेश नाईक यांना देण्यात आले आहे.