भाजपमध्ये करणार प्रवेश...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय कुरघोड्यांना जोर चढला असून तुातील भाजपच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपने ही आता शिवसेनेच्या चार नगरसेवकांना आपल्याकडे ओढल्याने शिवसेनेला भाजपकडून जशास तसेच प्रत्युत्तर मिळाले आहे. तुातील शिवसेना नगरसेवक राजेश शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर काल पुन्हा घणसोलीतील नगरसेवक प्रशांत पाटील, सुवर्णा पाटील व कमलताई पाटील या शिवसेनेच्या तिघा नगरसेवकांनी शिवसेना नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन भाजपची वाट धरण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे शिवसेनेतून राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांची संख्या चार वर पोहचली असून या चारही नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे राजीनामा देतांना भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश देतांना नगरसेवकांची जनतेप्रतीअसलेली बांधिलकी, प्रामाणिकपणा या सर्व गोष्टी पाहून भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी काल स्पष्ट केले. भ्रष्ट नगरसेवकांना प्रवेश देणार नसल्याचेही ते म्हणाले. घणसोलीतील तीन नगरसेवकांनी सेनेला जय महाराष्ट्र केल्यामुळे नवी मुंबईत शिवसेनेला खिंडार पडले आहेघणसोलीतील शिवसेनेच्या नगरसेविका कमलताई पाटीलप्रशांत पाटील, सुवर्णा पाटील या तीन नगरसेवकांनी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे राजीनामा पत्र सुपूर्द केला आहे. याप्रसंगी माजी खा.डॉ.संजीव नाईक, माजी आ.संदीप नाईकभारतीय जनता पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नगरसेवक गिरीश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. याविषयी बोलताना भाजपाचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत म्हणाले कीभारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नवी मुंबईच्या होत असलेल्या विकासाला साथ देण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी भाजपात दाखल होत आहेत.