वाहनाने चिरडल्याने चालकाचा मत्य

वाशी (वार्ताहर)- वाशी से-१९ सैराट बारजवळीले रोडवर वाशी (वार्ताहर)- वाशी से-१९ सैराट बारजवळील रोडवर अज्ञात वाहनाने चिरडल्याने ४५ वर्षीय संतोष संपत मोरे नावाच्या सातारा जिल्ह्यातील मु. आंबेदरवाडी येथील चालकाचा मृत्यू झाल्याची घटना दि. १२ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत हकीकत अशी कि , सैराट बार जवळच्या रोडवर एका अनोळखी व्यक्तीला अज्ञात वाहनाने चिरडल्याने तो गंभीर जखमी झाला असल्याची माहिती ट्रक ट्रमिनलमध्ये सुपरवायझर असलेल्या मिलींद माने याना आपल्या कर्मचाऱ्यांकडून मिळाली होती. त्यानंतर माने यांनी ताबडतोब एपीएमसी पोलिस ठाण्यात फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी सदर इसमाला उपचाराकरीता मनपा हास्पीटल, वाशी येथे दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यापुर्वीच सदर इसमाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सदर अनोळखी इसमाचे खिश्यात वाहन चालवण्याचा परवाना व कागदांवर फोन नंबर मिळुन आल्याने त्याची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मिलींद माने यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनावरील चालकाविरुध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.