बंद, बेवारस वाहने हटवा अन्यथा कारवाई

नवी मुंबई (प्रतिनिधी) - शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यावर असलेली बंद बेवारस वाहने संबंधीत वाहन मालकांनी तात्काळ हटवावीत, अन्यथा अशा वाहनांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नवी मुंबई महापलिकेने शहरवासीयांना दिला आहे. मासायाना दिला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये रस्त्यावरील तसेच पुलाखालील एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांची संख्या वाढलेली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे साफसफाईच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. शहरातील सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अशी बंद बेवारस वाहने ठिकठिकाणी मुख्य रहदारीचे रस्ते व अंतर्गत रसत्यांवर असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत मानिसको जाने वाला आहे. शिवाय बंद अवस्थेत असलेल्या वाहनाखाली मोठ्या प्रमाणात कचरा असल्यामुळे तो नियमित साफसफाई करता येत नाही. याबाबत महापालिकेने नियमितपणे वाहने हटविणेबाबत नागरिकांना जाहीर आवाहन केलेले होते. मात्र, अदयापही नागरिकांनी बंद बेवारस अवस्थेत असलेली वाहने हटविलेली नाहीत. सदरची वाहने संबंधीत वाहन मालकांनी तात्काळ न हटविल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. दररम्यान, महापालिकेमार्फत हटविण्यात आलेली वाहने महापालिकेच्या क्षेपणभूमी येथे जमा करण्यात येणार आहेत. ज्या मालकांची वाहने महापालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत यापूर्वी उचलण्यात आली असतील, अशा वाहनांच्या मालकांनी त्या त्या विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.