वाशी (प्रतिनिधी) - भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व महापालिकेतील भाजपचे गटनेता रामचंद्र घरत यांच्या वाढदिवसानिमित्त तुर्भे गाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित करण्यात आले होते. यावेळी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते तुर्भे गावाच्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन, तुर्भे गावातील मच्छीमार्केटचे स्व. एठीजेठी मच्छिमार्केट नामकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे वाढदिवसानिमित्त तुर्भे गाव येथे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी अनेक नेत्र रुग्णांची नेत्र तपासणी करीत काही जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तर शुगर तपासणी, हृदय ई.सी.जी. तपासणी, तर्भे परिसरात साखर वाटप. इंदिरा नगर येथे फळ वाटप, स्वच्छता अभियान अशी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमास नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला.
विविध उपक्रमांनी नगरसेवक रामचंद्र घरत यांचा वाढदिवस साजरा